मुंबई

राजस्थानातून वाहन चोरट्याला अटक

CD

राजस्थानातून वाहन चोरट्याला अटक
सात महिन्यांनंतर कारचा शोध; कल्याण पोलिसांच्या पथकाला यश
टिटवाळा, ता. १९ (वार्ताहर) : शहरातील रेजन्सी सर्वम परिसरातून चोरीला गेलेली कार सात महिन्यांनंतर राजस्थानातून शोधून काढण्यात कल्याण तालुका पोलिस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाला यश आले आहे. या प्रकरणात जोधपूर येथून मुख्य आरोपीला अटक केली असून चोरीला गेलेली गाडी जप्त केली आहे.
आंध्र प्रदेशातील बाळा कोटेश्वराव व्यंकटसुबाराव लिंगोनेनी यांच्या मालकीची कार अज्ञात चोरट्याने २३ जानेवारीला शहरातील पार्किंगमधून चोरून नेली होती. याप्रकरणी कल्याण तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. गुन्ह्याच्या तपासासाठी पोलिस निरीक्षक बाळा कुंभार यांच्या नेतृत्वाखालील पथकाने घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज, कॉल डेटा रेकॉर्ड, सबस्क्रायबर डिटेल्स यांचे सखोल विश्लेषण केले. तपासादरम्यान सुरेश काळूराम उदाणी (रा. उधाणी की धनी, ता. फलोदी, जि. जोधपूर) याच्यावर संशय बळावला; मात्र आरोपी सातत्याने मोबाईल क्रमांक बदलत असल्याने त्याला शोधणे अडचणीचे ठरत होते; मात्र पोलिस अंमलदार योगेश निर्मळ व कुणाल बावदाणे यांनी चिकाटीने तपास पुढे नेत तांत्रिक साधनांचा वापर करून आरोपीचा मागोवा घेतला. अखेर राजस्थानातील जोधपूर येथे आरोपीला अटक करण्यात आली. चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिली असून त्याच्याकडून कार आणि बनावट चावी जप्त केली आहे.
पोलिस अधीक्षक डॉ. डी. एस. स्वामी, उपविभागीय पोलिस अधिकारी मिलिंद शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई पार पडली. या मोहिमेत निरीक्षक बाळा कुंभार, सहाय्यक निरीक्षक नितीन मुदगुंन, उपनिरीक्षक जयवंत वारा, दीपक कुशारे, हवालदार बडगे, देसले, पोलिस अंमलदार भोईर, काळे, गुजर आणि पोलिस अधीक्षक कार्यालयातील रवींद्र मोरे, दीपक गायकवाड यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Supreme Court: ४१ वर्षांनंतर निकाल... सर्वोच्च न्यायालयाने ठरवले दोषी पण तुरुंगवासाची शिक्षा माफ, काय होता १९८५ मधील खटला?

धाडस केलं आणि टोकं अमाऊंट भरूनच टाकली... मराठमोळ्या इन्फ्ल्युएन्सरने मुंबईत घेतलं स्वतःचं घर; शेअर केले फोटो

Latest Marathi News Live Update : मुंबईत प्रभाग समितीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात

Trimbakeshwar Temple Assault : भाविकाने ड्रग्ज घेतले हे ठरविणारे तुम्ही कोण? त्र्यंबकेश्वर मारहाणीवर मंत्री गिरीश महाजन संतप्त; नेमका काय प्रकार?

बापरे! सेक्रेड गेम्स फेम राजश्री देशपांडेला ब्रेस्ट कॅन्सचं निदान, सर्जरी सुद्धा झाली, म्हणाली...'लवकर कळालं पण...'

SCROLL FOR NEXT