मुंबई

पादचारी पुलावर दाट अंधार!

CD

पादचारी पुलावर दाट अंधार!
मोहिनी जाधव
बदलापूर, ता. १९ : रेल्वे प्रशासनावरील बदलापूरकरांचा राग हा दिवसागणिक वाढत आहे. मागील अनेक वर्षे रेल्वेस्थानकाचे काम सुरू आहे. त्यात छप्पर, आसन व्यवस्था, शौचालय या साध्या मूलभूत सुविधाही मिळत नाहीत. त्यातच आता पश्चिमेकडील बाजूला उतरण्यासाठी रेल्वेच्या पादचारी पुलाला जिने जोडलेले नाहीत. हा पूल ज्या स्कायवॉकला जोडलेला आहे, त्यावरून पश्चिमेकडील आणि पूर्वेकडील बाजूस उतरावे लागते; मात्र या जिन्यांवर दिवे नसल्याने रात्रीच्या दाट अंधारातून या ठिकाणाहून ये-जा करावी लागते. निदान रेल्वेने या ठिकाणी दिव्यांची सोय करावी, अशी मागणी बदलापूरकर करीत आहेत.

बदलापुरात कोणतेही नियोजन नसल्याने रेल्वे प्रशासनाचा सावळागोंधळ पाहायला मिळत आहे. मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनसकडील टोकाला रेल्वेचा एक पादचारी पूल आहे. हा पूल बांधताना पूर्व आणि पश्चिमेला रेल्वेस्थानकाला समांतर स्कायवॉक आहे. या स्कायवॉकला जोडून हा पूल बांधण्यात आला होता. त्यामुळे या पादचारी पुलावरून पूर्व आणि पश्चिमेला उतरण्यासाठी जिना नसल्याने स्कायवॉकच्या जिन्यांना हा पूल जोडण्यात आला. त्यामुळे पूल रेल्वेचा आहे, मात्र जिने एमएमआरडीएने बांधलेल्या स्कायवॉकचे आहेत. त्यामुळे तीन ते चार वर्षांपासून रेल्वेस्थानकाचे अद्ययावतीकरण काम सुरू आहे. तसेच बदलापूरचे प्रवासी छप्पर, आसन व्यवस्था, शौचालय या सगळ्या सुविधा मिळत नसतानाही पर्याय नसल्याने गपगुमान रेल्वे प्रवास करीत आहेत. सायंकाळी व रात्रीच्या वेळेत मात्र मुंबईकडील टोकाला असलेल्या या पुलावरून पूर्व व पश्चिमेला उतरणाऱ्या प्रवाशांना स्कायवॉकच्या या जिन्यावर विजेचे दिवेच नसल्याने अंधारातूनच वाट काढत ये-जा करावी लागत आहे.
त्यात हा स्कायवॉक जीर्ण झाला आहे. जिन्यावरील छप्पर तुटलेले आहे. त्यामुळे पावसात जिन्यावर पाणी पडत असते. येथील जिन्यावरील फरशा तुटलेल्या आहेत. कडेला असलेले पत्रे वर आले आहेत. चढताना, उतरताना अंदाज न आल्यास पायाला गंभीर दुखापत होऊ शकते. त्यामुळे अशा त्रासदायक परिस्थितीतून बदलापूरकर रोजची धावपळ करीत आहेत. रेल्वे प्रशासनाचे प्रवाशांच्या या समस्येकडे अजिबात लक्ष नसल्याची तक्रार प्रवास करीत आहेत.

रेल्वेस्थानक होईल तेव्हा होईल, पण निदान सध्य:स्थितीला वापरात दिलेल्या या जिन्यावर विजेच्या दिव्याची सोय करून द्यावी. रात्री अंधारातून हा जिना चढताना-उतरताना खूप भीती वाटते. अंधारामुळे या ठिकाणी रात्रीच्या वेळेत भिकारी आणि गर्दुल्लांचा वावर असतो. त्यात पूर्व-पश्चिमेला उतरण्यासाठी हाच एक पर्याय असल्याने लवकरात लवकर या ठिकाणी विजेची सोय करून द्यावी.
- शामली पाटील, महिला रेल्वे प्रवासी

वर्षभरातच बदलापूर रेल्वे स्थानकाचे काम पूर्ण होईल, अशी आश्वासने आम्ही गेली तीन ते चार वर्षे सतत ऐकत आहोत; मात्र आजतागायत हे आश्वासन काही पूर्ण झालेले नाही. त्यातच सायंकाळी गर्दीच्या वेळेत घरी पोहोचण्यासाठी या पुलावरून उतरताना अंधार असल्याने मोठा त्रास सहन करावा लागतो. इथल्या जिन्यावरील फरशादेखील तुटल्याने पावसाळ्यात प्रवासी कित्येकदा घसरून पडल्याच्या घटनादेखील घडल्या आहेत.
- स्वप्नील पाटील, रेल्वे प्रवासी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

बॅनरवर फोटो नसल्याने शिवसैनिकांमध्ये मोठा वाद! पालकमंत्री सरनाईकांच्या स्वागतासाठी लावलेले 8 ते 10 बॅनर कार्यकर्त्यांनीच फाडले

ENG vs IND, 4th Test: टीम इंडियात मोठा बदल! CSK चा २४ वर्षीय गोलंदाजाची अचानक संघात एन्ट्री

Engineer Drug Dealer : सॉफ्टवेअर इंजिनिअर वृषभ बनला ड्रग्ज डिलर, नशेने आयुष्याची राख रांगोळी, विमानाने दिल्ली... ट्रकने कोल्हापूर प्रवास

‘देवीचा अवतार घेऊ पाहिलं आणि स्टेजवरच अपमान झाला!’ ममता कुलकर्णीचा व्हिडिओ तुफान व्हायरल!

Manikrao Kokate Video : शेतकरी दररोज जीवन संपवतोय अन् कृषिमंत्री विधिमंडळात पत्ते खेळताहेत; रोहित पवारांकडून व्हिडिओ ट्विट

SCROLL FOR NEXT