मुंबई

जव्हारमध्ये गॅस्ट्रोने दोन जणांचा मृत्यू

CD

जव्हार, ता. १९ (बातमीदार) : नांदगाव ग्रामपंचायतीमधील राजेवाडी पाड्यात गॅस्ट्रोची साथ आली आहे. या परिसरात गॅस्ट्रोमुळे दोन व्यक्तींचा मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण असून आजही तब्बल १४ रुग्ण उपचार घेत असून त्यांची प्रकृती सध्या स्थिर असल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात येत आहे.

पावसाळा सुरू झाला, की विहिरींवर अवलंबून असलेल्या अनेक गावांत दूषित पाण्यामुळे साथीचे रोग पसरतात. माॅन्सूनपूर्व तयारीच्या निमित्ताने आरोग्य विभाग नेमकी कोणती उपाययोजना करते, हा संशोधनाचा भाग आहे, असे नागरिक सांगतात. दरम्यान, सध्या ही साथ आटोक्यात आणण्यासाठी जव्हार आरोग्य विभाग प्रयत्नशील आहे; मात्र या साथीमुळे चिंतू गोंड (५५) आणि अनिता गांगड (४५) यांना आपला जीव गमवावा लागल्याने हळहळ व्यक्त होत आहे.

दोन दिवसांपूर्वी नागरिकांना अगोदर जुलाब, उलटी व्हायला लागली; मात्र याची तीव्रता वाढत जाऊन अनेक नागरिकांना उपचारासाठी जव्हार कुटीर रुग्णालय, नांदगाव प्राथमिक आरोग्य केंद्र याठिकाणी दाखल करण्यात आले. यामधील एकाचा जव्हार रुग्णालयात, तर एकाचा राहत्या घरी मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे.

गेल्या दोन वर्षांपासून जव्हार तालुक्यात जलजीवन योजनेची कामे चालू आहेत. ते अद्याप पूर्ण झाली नाहीत; अन्यथा आज नळाला शुद्ध पाणी मिळाले असते आणि ही घटना टळली असती.
- एकनाथ दरोडा, अध्यक्ष, सरपंच संघटना

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Crime : विधानभवनाबाहेर तरूणाचा आत्मदहनाचा प्रयत्न, अंगावर रॉकेल ओतून घेतले अन्... पोलिसांच्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळला

India Captain: संजू सॅमसन होणार भारतीय संघाचा कर्णधार? सूर्यकुमार यादवनंतर T20 तील नेतृत्वाबाबत चर्चेला उधाण

Latest Marathi News Live Update : कोराडी थर्मल पॉवर स्टेशनमध्ये अपघात; गरम वाफेच्या झळीत चार कर्मचारी भाजले

आता बसचे स्टिअरिंग महिला चालकांच्या हाती! सक्षमीकरणाचा प्रशासनाचा ऐतिहासिक निर्णय; ४०० महिलांची भरती होणार, कुठे अन् कधी?

अर्शदीप सिंगने 'माफी' मागायला नको हवी होती, तू देशाचे प्रतिनिधित्व करतोस; गौतम गंभीरचं रोखठोक मत, वन डे वर्ल्ड कपचा प्लान सांगितला

SCROLL FOR NEXT