मुंबई

मूर्तिकारांसमोरील संकट गंभीर

CD

विरार, ता. १९ (बातमीदार) : गणेश मूर्तिकारांना मोफत शाडू माती उपलब्ध करून देण्याचे वसई-विरार महापालिकेने आश्वासन दिले होते; मात्र याबाबत अद्याप निर्णय होत नसल्याने गणेशोत्सवाच्या तोंडावर तब्बल २४० हून अधिक मूर्तिकारांसमोर संकट उभे राहिले आहे. पालिका प्रशासन माती उपलब्ध करून देणार कधी आणि त्यातून मूर्ती साकारणार कधी, या चक्रव्यूहात शहरातील मूर्तिकार सापडले आहेत.

पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याच्या दृष्टिकोनातून जास्तीत जास्त शाडूच्या मूर्ती बनविण्यास प्रोत्साहन मिळावे, यासाठी मूर्तिकारांना शाडूची माती उपलब्ध करून देण्याचे आश्वासन पालिकेने दिले होते. त्या अनुषंगाने पालिका मुख्यालयात गुरुवारी (ता. १०) मूर्तिकारांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत मूर्तिकारांसमोरील समस्या आणि अपेक्षा जाणून घेण्यात आल्या होत्या. प्रसंगी विरार-वसई मूर्तिकार गणेश संस्थेचे अध्यक्ष जितेश पालकर यांनी पहिल्या टप्प्यात किमान २५ पारंपरिक मूर्तिकारांना प्रति मूर्तिकार ४० गोणी माती उपलब्ध करून द्यावी; तसेच व्यवसायाकरिता आवश्यक मंडपाला मूल्य आकारू नये, अशी सूचना केली होती.

दरम्यान, शाडू मातीच्या उपलब्धतेकरिता तीन विक्रेत्यांची आवश्यकता पालिकेने व्यक्त केली होती. माती किमतीचा तुलनात्मक अभ्यास करून कमी किमतीच्या दरातील शाडू माती खरेदीचा निर्णय घेण्यात येणार होता. त्यानुसार या संस्थेने पालिकेला वितरकांची सूचीही सुपूर्द केली होती; परंतु विक्रेत्यांनी माती खरेदीची १०० टक्के रक्कम आगाऊ मागितलेली असल्याने पालिकेला ही अट मान्य नसल्याची माहिती समोर आली आहे. परिणामी, शाडू माती खरेदीचा निर्णय रखडल्याचे म्हटले जात आहे. निर्णय होत नसल्याने शहरातील २४० हून अधिक मूर्तिकारांसमोर संकट निर्माण झाले आहे.

महापालिकेला तीन स्मरणपत्रे
पालिका माती खरेदी करणार कधी आणि त्यातून आम्ही मूर्ती साकारायच्या कधी, असा प्रश्न या निमित्ताने विरार-वसई मूर्तिकार गणेश संस्थेचे अध्यक्ष जितेश पालकर यांनी केला आहे. शाडू माती खरेदीचा निर्णय तत्काळ घेण्यात यावा, यासाठी या संस्थेने आतापर्यंत महापालिकेला तब्बल तीन स्मरणपत्रे दिली असल्याचेही ते म्हणाले.

प्रशासकीय कारभाराचा फटका
शाडू माती खरेदीसंदर्भातील फाईल आयुक्तांच्या मान्यतेसाठी गेलेली आहे. माती विक्रेत्यांच्या अग्रीम रक्कम मागणीसंदर्भातील निर्णय लेखा विभागाच्या विचाराअंती घेतला जाणार आहे. या सगळ्यावर निर्णय होऊन या आठवडाअखेर माती खरेदी करून ती मूर्तिकारांना वितरित केली जाण्याची अपेक्षा आहे, असे महापालिकेच्या पर्यावरण विभागाचे उपायुक्त अजित मुठे यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Engineer Drug Dealer : सॉफ्टवेअर इंजिनिअर वृषभ बनला ड्रग्ज डिलर, नशेने आयुष्याची राख रांगोळी, विमानाने दिल्ली... ट्रकने कोल्हापूर प्रवास

‘देवीचा अवतार घेऊ पाहिलं आणि स्टेजवरच अपमान झाला!’ ममता कुलकर्णीचा व्हिडिओ तुफान व्हायरल!

Manikrao Kokate Video : शेतकरी दररोज जीवन संपवतोय अन् कृषीमंत्री विधिमंडळात रमी खेळताहेत; रोहित पवारांकडून व्हिडिओ ट्विट

'स्लीपिंग प्रिन्स' अल-वलीद बिन खालेद यांचं निधन; सौदी अरेबियातील राजघराण्यावर शोककळा, 20 वर्षे होते कोमात, असं काय घडलं त्यांच्याबाबतीत?

Latest Maharashtra News Updates : एकनाथ शिंदे यांच्या विरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून पुण्यात बॅनरबाजी

SCROLL FOR NEXT