मुंबई

मालमत्ता कर, पाणी बिल भरणा शिबिराला उस्फूर्त प्रतिसाद

CD

मालमत्ता कर, पाणीबिल भरणा शिबिर
कल्याण, ता. २० (बातमीदार) : महापालिका आयुक्त अभिनव गोयल यांच्या आदेसानुसार अतिरिक्त आयुक्त गोडसे, मालमत्ता कर विभागाच्या उपायुक्त गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली तिसगावच्या रचना पार्कमधील न्यू रचना ज्येष्ठ नागरिक सेवा संस्थेत मालमत्ता कर व पाणीबिल भरणा शिबिर आयोजित केले होते. याला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या शिबिरादरम्यान नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर सहभाग नोंदवत आपले कर भरण्याचे कर्तव्य बजावले. एकूण ९१ कर भरणा पावत्यांद्वारे एक लाख ७३ हजार ६३५ इतकी रक्कम जमा केली. तसेच ऑनलाइन माध्यमातून ९१ हजार इतकी भर पडली. यामुळे महापालिकेच्या महसूल संकलनात लक्षणीय वाढ झाली आहे. शिबिरादरम्यान पाच मालमत्ता हस्तांतरण प्रकरणे तत्काळ निकाली काढण्यात आली. ही या उपक्रमाची खास बाब ठरली. या सेवेमुळे नागरिकांचा वेळ आणि खर्च वाचला असून, त्यांनी या उपक्रमाचे कौतुक केले. महापालिकेच्या वतीने आयोजित या शिबिरात नागरिकांना एकाच ठिकाणी सर्व सुविधा मिळाल्या. भविष्यातही अशा प्रकारच्या उपक्रमांचे आयोजन करावे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manikrao Kokate Rummy Video : रमी नव्हे तर 'हा'गेम खेळत होतो… माणिकराव कोकाटेंनी काय दिलं स्पष्टीकरण?

Manikrao Kokate Rummy: कृषीमंत्री कोकाटेंच्या 'रमी' व्हिडिओनंतर ऑनलाईन गेमिंगवर बंदी येणार का? फडणवीस काय म्हणाले होते?

Ahilyanagar: डॉ. आंबेडकर पूर्णाकृती पुतळ्याचे उपमुख्यमंत्री पवारांच्या हस्ते अनावरण: संग्राम जगताप; २७ जुलैला हाेणार अनावरण

WCL 2025 Video: क्रिकेटमध्ये पुन्हा बॉल-आऊट! द. आफ्रिकेने विंडीजवर मिळवला थरराक विजय

Mumbai News: अनधिकृत बांधकामाला अधिकाऱ्यांचे प्रोत्साहन! न्यायालय अ‍ॅक्शन मोडमध्ये; कारवाईची टांगती तलवार

SCROLL FOR NEXT