मुंबई

बनावट औषध पुरवठादारांवर कारवाईची मागणी

CD

विरार, ता. १९ (बातमीदार) : वसई पूर्वेकडील सातिवली येथे वसई-विरार महापालिकेचे माता बाल संगोपन केंद्र आहे. यामध्ये महिन्याला शेकडो महिलांची प्रसूती होते आणि नवजात शिशूंची देखभाल केली जाते. प्रसूतीनंतर महिलांसह नवजात बाळालाची प्रकृती बरी होईपर्यंत त्यांना तिथेच ठेवले जाते. तसेच प्रकृती ठीक होण्यासाठी महापालिकेतर्फे मोफत औषधे दिली जातात, परंतु काही दिवसापूर्वी अन्न आणि औषध प्रशासनाने केलेल्या कारवाईत याठिकाणी बनावट औषधसाठा मिळाला होता. अशी औषधे पुरवणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी नागरिकांनी पोलिसांकडे केली आहे.

काही दिवसांपूर्वी अन्न व औषध प्रशासनाने सातिवली संगोपन केंद्रात भेट देऊन औषधांची तपासणी केली असता ती बनावट असल्याचे निदर्शनास आले. जर बनावट औषधे प्रसृत महिला व बाळाला दिली गेली, तर दोघांच्याही आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. बनावट औषधे पुरवणारे पुरवठादार हे प्रसूतीसाठी येणाऱ्या महिलांच्या जीवाशी खेळ खेळण्याचे काम करित आहेत, म्हणून या घटनेची गंभीर दखल घेत सातिवली येथील ग्रामस्थांकडून पुरवठादार, तसेच त्यात दोषी असलेल्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशा मागणीचे ग्रामस्थांकडून निवेदन वालिव पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक घुगे यांना देण्यात आले आहे. या पुरवठादारावर गुन्हा दाखल झालेला आहे, तसेच लवकरच परवानासुद्धा रद्द करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

T20 WC 2026 Prize Money : भारतीय संघाला २४.२७ कोटी; पाकिस्तानच्या वाट्याला किती? ICC ने जाहीर केली बक्षीस रकमेची विभागणी

नागपूर-रत्नागिरी महामार्ग ८ पदरी असणार का? शक्तीपीठ द्रुतगती महामार्गाची महत्त्वाची माहिती देत एकनाथ शिंदेंनी उत्तरच सांगितलं!

LPG Supply in India : युद्धामुळे LPG चा पुरवठ्याचं संकट; इंटरनेटवरही होणार परिणाम?

आता मजा येणार ! मानिनीने केली रम्या आणि वसू आत्याच्या कारस्थानची पोलखोल ; प्रेक्षक झाले खुश

Pune crime cctv: पुणं हादरलं! मित्राची थट्टा केली म्हणून आला राग, सपासप वार करत केला खून! सीसीटीव्ही व्हायरल

SCROLL FOR NEXT