मुंबई

आपटी गावात दहा जणांना गॅस्ट्रोची साथ

CD

वाडा, ता. १९ (बातमीदार) : आपटी गावात गॅस्ट्रोची साथ उद्‍भवली असून गावातील दहा नागरिकांना लागण झाली आहे. त्यांच्यावर विविध रुग्णालयांत उपचार सुरू आहेत. या घटनेमुळे गावात भीतीचे वातावरण पसरले आहे.

गौरी मिसाळ (वय १८) आणि आर्या मिसाळ (११) यांवर गोऱ्हे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार सुरू असून रोशन फसाळे (१२), किशोर फसाळे (४७), रोहित हिलीन (२१), वैशाली हिलीन (२०), वैष्णवी हिलीन (३५), दीपाली कांबळे (चार), नाव्या मिसाळ (दोन) व निकेत सवरा (पाच) यांना उपचार करून घरी सोडण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.

आपटी गावातील दहा नागरिकांना गुरुवार (ता. १७)पासून उलटी व जुलाब होऊ लागल्याने त्यांना गोऱ्हे येथील प्राथमिक आरोग्य केंद्र व वाडा येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले होते. त्यांच्यावर उपचार करून काहींना घरी सोडण्यात आले आहे. गौरी आणि आर्या यांच्यावर गोऱ्हे आरोग्य केंद्रात उपचार सुरू आहेत. आता रुग्णांच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याची माहिती वैद्यकीय अधिकारी डाॅ. यामिनी रोंगठा यांनी दिली. दूषित पाणी प्यायल्याने ही साथ उद्भभवली असून ग्रामपंचायतीने टँकरने पाणीपुरवठा करण्याच्या सूचना आरोग्य विभागाला दिल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asia Cup 2025 साठी कर्णधार सूर्यकुमारसह हार्दिक पांड्या दुबईला रवाना; कुठे करणार सराव, काय आहे वेळापत्रक; घ्या जाणून

Mumbai Local: मुंबई लोकलच्या 'या' मार्गावर काही लोकल रद्द, का आणि कधी? जाणून घ्या

Latest Marathi News Updates: राधाकृष्ण विखे पाटील मनोज जरांगेंच्या भेटीला

Working Hours Increase: कामाचे तास वाढल्याने कामगार क्षेत्रात असंतोष, सरकारच्या निर्णयाला विरोध

Crime: पती बाजारातून समोसे आणायला विसरला, पत्नी संतापली, रागाच्या भरात नको ते करून बसली, काय घडलं?

SCROLL FOR NEXT