मुंबई

आंतरराष्ट्रीय स्पर्धेत ॲनेल गौडा यांना दोन सुवर्ण

CD

आंतरराष्ट्रीय स्पर्धेत ॲनेल गौडास दोन सुवर्ण
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. १० : इंटरनॅशनल पॉवरलिफ्टिंग फेडरेशन तसेच जपान पॉवरलिफ्टिंग असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने ६ ते १३ जुलैदरम्यान आशिया-आफ्रिका पॅसिफिक पॉवरलिफ्टिंग आणि बेंच प्रेस चॅम्पियनशिप स्पर्धा पार पडल्या. यामध्ये ठाण्याचा खेळाडू अ‍ॅनेट महेश गौडा याने भारताचे प्रतिनिधित्व करीत पाच पदके पटकावली आहेत. यामध्ये दोन सुवर्णपदकांसह रौप्य आणि कांस्यपदकांचा समावेश आहे. या स्पर्धेत ८४ किलो वजनी गटात खेळून मास्टर-१ पॉवरलिफ्टिंग या प्रकारात रौप्य पदक भारताला मिळवून दिले. स्कॉट या प्रकारात १४२.५ किलो उचलून रौप्यपदक, बेंच प्रेसमध्ये ७५ किलो उचलून सुवर्णपदक, डेडलिफ्ट प्रकारात १४७.५ किलो उचलून कांस्यपदक तसेच एकूण ३६५ किलो वजन उचलून पॉवरलिफ्टिंग या प्रकरणात रौप्यपदक पटकावले आहे. आशिया आफ्रिका पॅसिफिक बेंच प्रेस चॅम्पियनशिप या स्पर्धेत ७५ किलो वजन उचलून सुवर्णपदक पटकावले, तर वयाच्या ४२व्या वर्षी भारताला दोन सुवर्ण, दोन रौप्यपदक आणि एक कांस्यपदक आपल्या नावावर केले आहे. अ‍ॅनेट गौडा या ठाण्याच्या रिओ फिटनेस मॅनेजमेंट या जिममध्ये स्वप्नील पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करीत आहे.
......
MUM25E98822

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Harish Rana Case: १३ वर्षांपूर्वी हरीश राणाला काय झालेलं? परदेशात विषारी इंजेक्शन टोचतात; पण भारतात इच्छामरण कसं दिलं जातं? कायदा काय सांगतो?

MSRTC Recruitment : खूशखबर! एसटी महामंडळात 17 हजार पदांची 'महाभरती'; कंत्राटी कर्मचाऱ्यांसाठी मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली मोठी अपडेट

LPG संपला, चपाती-भाकऱ्या भाजायच्या कशा? रुग्णांना दिल्या जाणाऱ्या जेवणात कपात; रुग्णांचे हाल

Navale Bridge Accident : नवले पुलावर पुन्हा अपघात ! भरधाव कार डिव्हायडरला धडकून उलटली

BCCI Awards: राहुल द्रविडला जीवनगौरव, तर टी२० संघातून वगळलेल्या खेळाडूला सर्वोत्तम क्रिकेटपटूचा पुरस्कार

SCROLL FOR NEXT