मुंबई

पालिका शाळेतील मुलांना ''इंग्रजीमध्ये बोला पटकन'' पुस्तक भेट

CD

पालिका शाळेतील मुलांना ‘इंग्रजीमध्ये बोला पटकन’ पुस्तक भेट
जुईनगर, ता. १९ (बातमीदार) : संतोष सुतार प्रतिष्ठान यांच्या तर्फे नेरुळ येथील शिरवणे शाळेतील विद्यार्थ्यांना इंग्रजीमध्ये बोला पटकन या पुस्तकाचे वाटप करण्यात आले. नवी मुंबई महापालिका शाळेतील विद्यार्थी दिवसागणिक प्रगती करत असून त्यांच्या यशाला आणखी उंच भरारी मिळावी म्हणून या पुस्तकाचे वाटप करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.
नवी मुंबई शहरात विमानतळासह अनेक मोठे उद्योग व्यवसाय निर्माण झाले आहेत. अशावेळी मुलांना नोकरी व्यवसाय करताना संभाषणात अडथळा येऊ नये. सहजरित्या नोकरी व्यवसायात प्रगती साधता यावी. शिवाय जगातील व्यवहाराची भाषा म्हणून इंग्रजी भाषेला प्राधान्य देण्यात येते. त्यामुळे आपल्या मातृभाषेबरोबर इंग्रजी भाषा महापालिकेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना अवगत व्हावी यासाठी या पुस्तकांचे वाटप करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. प्रतिदिन इंग्रजी वाचनाने इंग्रजी भाषा बोलण्याचे सूत्र विद्यार्थ्यांच्या हाती येईल अशा विश्वास मार्गदर्शकाकांडून व्यक्त करण्यात आला.
या प्रसंगी संस्थापक संतोष सुतार, अध्यक्ष सचिन सुतार, शाळेच्या मुख्याध्यापिका साळवी, अमृत पाटील, प्रतीक यादव आदी मान्यवर उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Harish Rana Case: १३ वर्षांपूर्वी हरीश राणाला काय झालेलं? परदेशात विषारी इंजेक्शन टोचतात; पण भारतात इच्छामरण कसं दिलं जातं? कायदा काय सांगतो?

"खरे हिरो बाबाच!" शिवम दुबेने T20 World Cup चे मेडल घातलं वडिलांच्या गळ्यात; पाहा Video

Female Foeticide Law : 7 ते 10 वर्षांची जेल आणि थेट कारवाई! स्त्रीभ्रूण हत्येचा कलंक पुसण्यासाठी सरकारने आखला 'हा' प्लॅन; आरोग्यमंत्र्यांचा महत्त्वपूर्ण निर्णय

ठरलं! या दिवशी भेटीला येतेय 'मोहिनी'; कलर्स मराठीवर 'ही' गाजलेली मालिका होणार बंद? प्रेक्षक नाराज

Latest Marathi News Live Update : मुंबई-नागपूर महामार्गावर कारने चौघांना उडवलं

SCROLL FOR NEXT