मुंबई

लहान मुलांवर तिसरी भाषा लादू नये - खासदार सुप्रिया सुळे

CD

‘दारुविरोधात महिलांनी रस्त्यावर उतरण्याची वेळ’
खासदार सुप्रिया सुळेंचे प्रतिपादनः शरद पवार गटाच्या वतीने महिला मेळावा व युवक मेळावा
खारघर, ता.१९ (बातमीदार) : राज्यात नवीन दारूची दुकाने नको, त्यासाठी सर्व महिलांनी पक्षभेद सोडून रस्त्यावर उतरण्याची वेळ आली तरी चालेल, असे खासदार सुप्रिया सुळे यांनी खारघर येथे सांगितले. यावेळी खासदार निलेश लंके, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या महिला प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे, उपाध्यक्षा भावना घाणेकर, पनवेल जिल्हा महिला अध्यक्षा राजश्री कदम यांच्यासह आदी मान्यवर उपस्थित होते.
शहर राष्ट्रवादी पक्ष शरद पवार गटाच्या वतीने महिला मेळावा व युवक मेळावा गुरुवारी (ता. १७) खारघरमध्ये पार पडला. यावेळी सुप्रिया सुळे म्हणाल्या, प्रत्येक मुलांना मातृभाषा आलीच पाहिजे, लहान मुलांचे शिक्षण हे खेळीमेळीचे असते. त्यामुळे त्यांच्यावर तिसरी भाषा लादू नये. तर, महिलांनी स्वयंरोजगारकडे लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे. महिलांनी तयार केलेल्या वस्तू, साहित्य मॉल, दुकानात वितरण करणे आवश्यक असल्याचे सांगितले.
तसेच, राज्यात नवीन दारूची दुकाने नको, त्यासाठी सर्व महिलांनी पक्षभेद सोडून रस्त्यावर उतरण्याची वेळ आली तरी चालेल. परंतु, नवीन दारूची दुकाने नको. तसेच, शाळा परिसरलगत दारू, सिगारेट, गुटखा विक्री दुकाने असता कामा नये. दारू आणि ड्रग्समुळे अनेक कुटुंबात गंभीर परिणाम होत असल्याचेही सुप्रिया सुळेंनी म्हंटले आहे.
यावेळी पक्षाच्या वतीने महिलांना घरगुती स्वयंरोजगार करता यावे यासाठी निलेश लंके प्रतिष्ठणच्या वतीने पन्नास महिलांना शिलाई वाटप करण्यात आले. यावेळी पनवेल जिल्हा महिला अध्यक्षा राजश्री कदम यांनी खारघरमध्ये संघर्ष समितीच्या वतीने खारघर दारूमुक्तीसाठी लढा सुरु आहे. या लढ्याला सुप्रिया सुळे सहकार्य करावे, असे सांगितले. यावेळी खासदार निलेश लंके, रोहिणी खडसे यांनी महिलांना स्वयंरोजगार विषयी मार्गदर्शन केले. यावेळी खारघर परिसरातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran Ship Attack: भारत संतप्त! होर्मुझ सामुद्रधुनीत जहाजावर इराणचा हल्ला; भारतीयांच्या मृत्यूने तणाव वाढला, केंद्र सरकारचा इशारा

Indian crew killed in Hormuz attack : इराणचा होर्मुझ समुद्रधुनीतील जहाजावर हल्ला, दोन भारतीयांचा मृत्यू तर एक बेपत्ता

T20 World Cup साठी भारतीय संघातून डच्चू अन् मग वडिलांनाही गमावलं; जितेश शर्माने सांगितला 'तो' कठीण काळ

Sangola Political: सांगोला तालुक्यात राजकीय भूकंप! साळुंखे-पाटलांचे पंचायत समितीचे तीन सदस्य भाजपमध्ये, पालकमंत्री जयकुमार गोरे यांचा मास्टरस्ट्रोक..

Latest Marathi News Live Update : नाशिकमध्ये शनिवारी हिंदूहित रक्षा मेळावा; मंत्री नीतेश राणे मार्गदर्शन करणार

SCROLL FOR NEXT