मुंबई

घणसोली नागरी आरोग्य केंद्राचा हिवताप विरोधात एल्गार

CD

घणसोली नागरी आरोग्य केंद्राचा हिवतापाविरोधात एल्गार
जूनपासून पालिकेच्या माध्यमातून १२ ठिकाणी जनजागृती
तुर्भे, ता. १९ (बातमीदार) ः पावसाळ्यात डासांपासून हिवताप आजाराची लागण मोठ्या प्रमाणात होते. त्यामुळे संबंधित आजाराला प्रतिबंधित करण्यासाठी नवी मुंबई महापालिकेच्या घणसोली नागरी आरोग्य केंद्राच्या माध्यमातून हिवतापाविरोधात एल्गार पुकारण्यात आला आहे. त्यासाठी नागरी आरोग्य केंद्राने घणसोली गाव व परिसरामध्ये आतापर्यंत १२ ठिकाणी जनजागृती कम्‍प लावून नागरिकांना सतर्क केले आहे. तसेच परिसरातील नागरिकांची हिवतापासंबंधी रक्त तपासणीदेखील केली जात आहे.
नवी मुंबई महापालिकेचे आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या आदेशानुसार आणि पालिकेचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रशांत जवादे यांच्या मार्गदर्शनाखाली घणसोली गाव नागरी आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. वैशाली म्हात्रे यांच्या माध्यमातून घणसोली गाव आणि परिसरात हिवताप विरोधी कम्प सुरू केले आहेत. यामुळे नागरिकांना पावसाळ्यातील आजारांची माहिती मिळत आहे. तसेच डासांपासून मुक्ती कशी मिळवायची याचीही विस्तृत माहिती कॅम्पच्या माध्यमातून देण्यात येत आहे. पावसाळा सुरू झाल्यानंतर मलेरिया, डेंगीसारख्या डासांची उत्पत्ती होत असते. मलेरिया जातीचा डास खराब पाण्यावर उत्पन्न होतो, तर डेंगी जातीचा डास स्वच्छ पाण्यावर उत्पादित होतो. त्यांचे प्रजनन होऊ नये, यासाठी काय करावे, याबाबत या कम्पच्या माध्यमातून नागरिकांना माहिती देण्यात येत आहे. यासाठी विविध साहित्याचादेखील वापर करण्यात येत आहे. यामुळे नागरिकांना पायाभूत डासविरोधी माहिती मिळत आहे. यामुळे हिवतापाने त्रस्त रुग्णांची संख्यादेखील कमी झाल्याचे सांगण्यात येत आहे.
..............
कोट
या कॅम्पमध्ये डासांची उत्पत्ती कशी होते याची पूर्णपणे माहिती दिली जाते. तसेच दक्षता कशी घ्यावी, हेदेखील सांगण्यात येते. पालिकेचे कर्मचारी जनजागृती मोहिमेत पूर्णत: झोकून देऊन काम करीत असल्याचे वैद्यकीय अधिकारी डॉ. वैशाली म्‍हात्रे यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Thane News: तिकीट मागितल्यानं तरुणीचा पारा चढला, महिला टीसीसोबत अमानुष कृत्य अन्...; ठाणे रेल्वे स्थानकावर काय घडलं?

IPL 2026 Schedule Announced : आयपीएलच्या १९व्या पर्वाचे वेळापत्रक जाहीर; RCB vs SRH यांच्यात सलामी; पहिल्या २० सामन्यांचं टाईमटेबल

महाराष्ट्रात पहिल्यांदाच ऐतिहासिक निर्णय! आई-बहिणीची शिवी दिली तर दंड आकारणार; नवा नियम लागू, दंड किती लागणार?

Gas Cylinder Shortage : गॅसटंचाईचा परिणाम! डोसा, उत्तप्पा व तळलेले पदार्थ हॉटेलातून होताय गायब

स्ट्रेट ऑफ होर्मुज संकट; भारताला LPG कसा मिळणार? तज्ज्ञांनी सांगितले पर्याय

SCROLL FOR NEXT