मुंबई

कैनाड प्लॉट घोटाळा उघड; कोट्यवधींची फसवणूक

CD

कैनाड प्लॉट घोटाळा
कोट्यवधींची फसवणूक; मुख्य आरोपी फरार
कासा, ता. १९ (बातमीदार) : डहाणूच्या कैनाड परिसरात प्लॉटिंग योजनेच्या नावाखाली कोट्यवधी रुपयांची फसवणूक उघड झाली आहे. या घोटाळ्याचा मुख्य सूत्रधार जयवंतराव नलावडे फरार असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत.
तुळजाभवानी प्रॉपर्टीज प्रा.लि. कंपनीने २०२२ मध्ये ६२ प्लॉट्स विक्रीसाठी काढले होते. त्यासाठी प्रत्येकी गुंतवणूकदारांकडून ४० लाख रुपये घेतले होते. प्लॉटसह गुंतवणुकीचा परतावा किंवा २५ लाख रोख बोनस देण्याचे आश्वासन दिले; मात्र मुदत संपूनही काहीही मिळाले नाही. कंपनीची कार्यालये बंद झाली आणि नलावडे फरार झाला. याबाबत गुंतवणूकदारांनी थेट डहाणूतील कार्यालयात जाऊन तक्रार केली.
तक्रारीनंतर पोलिसांनी कंपनीच्या काही स्थानिक प्रतिनिधींना अटक केली असून, ज्यांच्या माध्यमातून नोटरीकडे करारनामे नोंदवले गेले होते, त्यांच्यावर कारवाई केली आहे. तर, दीड कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे. किमान १०-१२ गुंतवणूकदारांची फसवणूक झाली असून, हा आकडा वाढण्याची शक्यता आहे. फसवणूक झालेल्या इतरांनी पालघर आर्थिक गुन्हे शाखेशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Solapur Water Crisis: सोलापूर शहरात आता चार अन् पाच दिवसांआड पाणी; तीन दिवसांआडची पद्धत बंद, जलवाहिनी नसलेल्या ठिकाणी टँकरने पुरवठा!

Nanded News: नांदेडमध्ये गॅस एजन्सीसमोर पहाटेपासून रांगा; घरगुती सिलिंडरवर व्यावसायिकांची नजर; घरगुती गॅसचा व्यावसायिक वापर वाढला

Latest Marathi News Live Update : कोल्हापूर जिल्हा परिषद अध्यक्ष राष्ट्रवादीचा होणार, येत्या मंगळवारी घोषणेची शक्यता

Navale Bridge Accident : पुण्यात नवले पूल चौकात भीषण अपघात; भरधाव ट्रकची सहा वाहनांना धडक, दुचाकीस्वार जागीच ठार

Solapur News: यशवंतराव चव्हाण जयंतीचा विसर! सुशोभीकरण पूर्णत्वास; साेलापूरातील सात रस्त्यावरील पुतळा झाकलेलाच..

SCROLL FOR NEXT