मुंबई

म्हाडाच्या घरांसाठी सहा दिवसात ७४२१ अर्ज

CD

म्हाडाच्या घरांसाठी
सहा दिवसांत ७,४२१ अर्ज
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १९ : सर्वसामान्यांच्या घराचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी म्हाडाच्या कोकण मंडळाने ५,२५७ घरांच्या विक्रीसाठी जाहीर केलेल्या लाॅटरीला चांगला प्रतिसाद मिळत आहे. अर्ज भरण्यास सुरुवात झाल्यापासून गेल्या सहा दिवसांत तब्बल सात हजार ४२१ जणांनी ऑनलाइन अर्ज भरला असून दोन हजार ४९९ जणांनी अनामत रक्कम भरली आहे.
म्हाडाच्या कोकण मंडळाने जाहीर केलेल्या पाच हजार २८५ घरांच्या लाॅटरीत अत्यल्प म्हणजे वार्षिक सहा लाखांपर्यंत उत्पन्न असलेल्या गटासाठी तब्बल चार हजार ८०२ घरे राखीव आहेत. तसेच, नऊ लाखांपर्यंत वार्षिक उत्पन्न असलेल्या अल्प उत्पन्न गटातील कुटुंबासाठी ४५५ घरे राखीव आहेत. या घरांसाठी ऑनलाइन अर्ज करण्याच्या प्रक्रियेला सोमवारपासून (ता. १४) सुरुवात झाली आहे. त्यानुसार आतापर्यंत आलेले अर्ज पाहता सर्वसामान्यांचा या लाॅटरीला चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे स्पष्ट झाले आहे. या लाॅटरीसाठी १३ ऑगस्ट ही ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम मुदत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Karad News : महाराष्ट्र केसरी स्पर्धेसंदर्भात महाराष्ट्रातील पैलवानांना क्रीडामंत्र्यांचा शब्द, म्हणाले....

Mohol News : भाजपचे मुस्लिम समाजाला 'रमजान'चे गिफ्ट; पंचायत समितीच्या सभापतीपदी भाजपचे अस्लम चौधरी, उल्का पाटील उपसभापती

Mojtaba Khamenei: ''प्रत्येक मृत्यूचा बदला घेऊ'', इराणच्या सर्वोच्च नेत्याने दिला पहिलाच इशारा; म्हणाले...

Nilanga Fire : निलंगा बस डेपोत डिझेल भरताना पंपाला लागली आग; तेल भरणारा वाहन परिक्षक भाजला, बसही पेटली

Leopard Attack: बिबट्यांना मारणे गुन्हा राहणार नाही; अनुसूची बदलण्यास मंजुरी, वाढत्या हल्ल्यांवर महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT