मुंबई

१०० कोटींच्या साहित्य खरेदी घोटाळ्याची नव्याने होणार चौकशी कौशल्य विकास मंत्री लोढा यांच्या आश्वासनानंतर विभागात हालचालींना वेग

CD

शंभर कोटींच्या साहित्य खरेदीची चौकशी
विधान परिषदेत प्रश्न उपस्थित झाल्यानंतर विभागाला जाग
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १९ ः व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाच्या साहित्य खरेदीत १०० कोटींच्या गैरव्यवहारप्रकरणी निवृत्त न्यायाधीशांमार्फत अथवा विभागीय स्तरावर उच्चस्तरीय सखोल चौकशी केली जाणार आहे. याबाबत कौशल्य विकासमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी विधान परिषदेत घोषणा केल्यानंतर संचालनालयात वेगाने हालचाली सुरू झाल्या आहेत.
संचालनालयातील विविध साहित्य खरेदीतील गैरव्यवहारप्रकरणी विधान परिषदेत २०२१ मध्ये प्रदीर्घ चर्चा झाली होती. तसेच तीन अधिकाऱ्यांचे निलंबनही झाले होते. त्यातील विजयकुमार गौतम हे निवृत्त झाले आहेत, लाच घेतल्याने अटक झालेले निलंबित अनिल जाधव पुन्हा विभागात कार्यरत आहेत. तसेच योगेश पाटील अद्यापही कोणत्याही कारवाईविना विभागात कार्यरत आहेत. दरम्यान, या प्रकरणातील काही फायली गायब करण्यासह हे प्रकरण अडवून ठेवणारे प्रदीप शिवतारे यांचे तत्काळ निलंबन करण्याची मागणी विधान परिषदेचे सदस्य दादाराव केचे, अभिजित वंजारी यांनी केली होती. शिवतारे आणि पाटील यांच्या कारनाम्याचा पाढाही त्यांनी सभागृहात वाचून दाखवला होता. त्यावर मंत्री लोढा यांनी सखोल चौकशी करून पुढील अधिवेशनापूर्वी यासंदर्भातील अहवाल सादर करण्याचे आश्वासन दिले.
--
लोकायुक्तांच्या आदेशालाही हरताळ
१०० कोटींच्या साहित्य घोटाळ्यातील अनेक दस्तावेज, सनदी अधिकाऱ्यांचे अहवाल लक्षात घेऊन लोकायुक्तांनी सक्तीने कारवाई करण्याचे आदेश वर्षभरापूर्वी दिले होते; मात्र विभागातील संबंधित अधिकाऱ्यांकडून हे प्रकरण दाबण्यात आले होते. आमदार केचे यांनी हे प्रकरण सभागृहापुढे मांडल्यानंतर मंत्री लोढा यांनी कोणालाही पाठीशी घालणार नसल्याचे स्पष्ट केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Harish Rana Case: १३ वर्षांपूर्वी हरीश राणाला काय झालेलं? परदेशात विषारी इंजेक्शन टोचतात; पण भारतात इच्छामरण कसं दिलं जातं? कायदा काय सांगतो?

"खरे हिरो बाबाच!" शिवम दुबेने T20 World Cup चे मेडल घातलं वडिलांच्या गळ्यात; पाहा Video

Female Foeticide Law : 7 ते 10 वर्षांची जेल आणि थेट कारवाई! स्त्रीभ्रूण हत्येचा कलंक पुसण्यासाठी सरकारने आखला 'हा' प्लॅन; आरोग्यमंत्र्यांचा महत्त्वपूर्ण निर्णय

ठरलं! या दिवशी भेटीला येतेय 'मोहिनी'; कलर्स मराठीवर 'ही' गाजलेली मालिका होणार बंद? प्रेक्षक नाराज

Latest Marathi News Live Update : मुंबई-नागपूर महामार्गावर कारने चौघांना उडवलं

SCROLL FOR NEXT