मुंबई

आता गप्प बसले, पूढच्या वेळेस गप्प बसणार नाही..

CD

आता गप्प बसले, पुढच्या वेळेस लक्षात ठेवा
आमदार मंदा म्हात्रेंची गणेश नाईकांवर नाराजी
सकाळ वृत्तसेवा
नवी मुंबई, ता. १९ : आपल्या मतदारसंघात महापालिका अधिकाऱ्यांच्या बैठकीचे आयोजन केल्याने भाजप आमदार मंदा म्हात्रे यांनी वनमंत्री गणेश नाईक यांच्यावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. आता गप्प बसले; पण पुढच्या वेळेस गप्प बसणार नाही, अशा शब्दांत म्हात्रे यांनी नाईकांना थेट इशारा दिला आहे. म्हात्रे यांच्या या नाराजीनाट्यामुळे नवी मुंबईत भाजपमध्ये पुन्हा दुफळी होण्याची दाट चिन्हे आहेत.
गणेश नाईक यांनी आज शनिवारी (ता. १९) वाशी येथे पालिका आयुक्तांच्या उपस्थितीत एक आढावा बैठक घेतली होती. या बैठकीला आपल्याला आमंत्रण किंवा माहिती नसल्याचे म्हात्रे यांनी स्पष्ट केले. बहुधा ही बैठक भाजपची नसल्यामुळे त्यांना मला बोलावणे महत्त्वाचे वाटले नसेल, असा टोला त्यांनी लगावला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचा दौरा केला तेव्हा चारही मतदारसंघांतील आमदारांना बोलावले होते, याकडे लक्ष वेधत म्हात्रे म्हणाल्या, की मोठी व्यक्ती नेहमीच सर्वांना सोबत घेऊन जाते. मला न बोलावल्यामुळे निवडणुकीच्या तोंडावर कार्यकर्त्यांमध्ये चांगला संदेश जात नाही.
मी नेहमी त्यांना मान दिला; पण गैरफायदा घेतल्यास गप्प बसणार नाही, असे म्हणत म्हात्रे यांनी नाईकांना नाव न घेता पुन्हा एकदा लक्ष्य केले. मी कधीच रस्त्यावर येऊन भांडण केले नाही; पण त्याचा कोणी गैरफायदा घेत असेल, तर पुढच्या वेळेस गप्प बसणार नाही, असा स्पष्ट इशाराही त्यांनी दिला.

नाईकांच्या कार्यपद्धतीवर टीका
आपल्या कुटुंबातील लोकांना घेऊन बैठका घ्यायच्या आणि पालिका अधिकाऱ्यांवर आरोप करायचे, ही नाईकांची स्टाइल नवी मुंबईला सर्वश्रुत आहे, असे म्हात्रे म्हणाल्या. नवी मुंबईचे पाणी चोरले, कोविड काळात औषधे चोरली, असे वारंवार बोलायचे; पण नक्की चोर कोण आहे, एकदाचे नाव तरी सांगून टाका, असा सल्लाही म्हात्रे यांनी नाईकांना दिला. खरा चोर कोण आहे, हे नवी मुंबईच्या जनतेला माहीत आहे. असे रोज बोलणे, हस्तक्षेप करणे आणि टोमणे मारणे हे आता खूप झाले आहे, असेही त्यांनी सुनावले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Gas Shortage: ''घाबरु नका, अडीच दिवसांमध्ये गॅस मिळेल'', पेट्रोलियम मंत्रालयाची पत्रकार परिषद

IPL 2026 Full Schedule : आयपीएलच्या पहिल्या २० सामन्यांत CSK, RCB, MI, PBKS, GT, LSG, RR, SRH, KKR, DC यांच्या वाट्याला किती सामने? संपूर्ण वेळापत्रक एका क्लिकवर

हा आहे महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम ईशा डेचा नवरा; या ठिकाणी दणक्यात पार पडणार लग्न; हास्यजत्रेच्या कलाकारांनी केली पोलखोल

Latest Marathi News Live Update : उड्डाणपुलाच्या अर्धवट कामामुळे गोंधळाची परिस्थिती

युद्धामुळे तांदूळ निर्यातीला फटका; विदर्भाचा बासमती अन् आंबेमोहोर अडकला बंदरात, भावही घसरले...

SCROLL FOR NEXT