मुंबई

एपीएमसीत पावणे तीन कोटींच्या तांदूळ फसवणूक प्रकरणाचा भांडाफोड

CD

एपीएमसीमध्ये २.७५ कोटींच्या तांदळाचा अपहार
पावणेतीन कोटी रुपयांच्या तांदळाची फसवणूक
पोलिसांकडून एजंट, बुकींचा शोध सुरू
नवी मुंबई, ता. १९ (वार्ताहर) : एपीएमसी मार्केटमध्ये तब्बल २.७५ कोटी रुपयांच्या तांदळाच्या फसवणुकीचा प्रकार उघडकीस आला आहे. एका एजंटने क्रिकेट सट्टेबाजीमध्ये गुंतलेल्या बुकींसोबत संगनमत करून ‘श्री व्यंकटेश्वरा कॉर्पोरेशन’ या घाऊक तांदूळ विक्रेत्या कंपनीला गंडा घातला. फसवणुकीतून मिळालेली सर्व रक्कम आयपीएल क्रिकेट सट्टेबाजीमध्ये गुंतवल्याचे समोर आले आहे. एपीएमसी पोलिसांनी याप्रकरणी एजंट जिग्नेश गजरा याच्यासह या प्रकरणात सहभागी असलेल्या सर्व बुकींविरोधात शुक्रवारी (ता. १८) गुन्हा दाखल करून त्यांचा शोध सुरू केला आहे.
‘श्री व्यंकटेश्वरा कॉर्पोरेशन’चे व्यवस्थापक जीवन कोतमवार (वय ५६) यांच्या तक्रारीनुसार, अधिकृत एजंट ‘नंदू ट्रेडर्स’चा व्यवस्थापक जिग्नेश गजरा याने बोगस ‘डी. जे. ट्रेडिंग’ कंपनीच्या माध्यमातून ही फसवणूक केली. जिग्नेश गजरा याने कंपनीकडून मागवलेला तांदूळ (ऐश्वर्या गोल्ड) एपीएमसी मार्केटमध्ये पोहोचण्यापूर्वीच बाहेर थांबवला. त्यानंतर ‘श्री व्यंकटेश्वरा कॉर्पोरेशन’ची खरी बिले काढून त्यावर बनावट जीएसटी क्रमांक असलेली ‘डी. जे. ट्रेडिंग’ची बिले लावली. हा तांदूळ एपीएमसी परिसरात कमी दरात विकून मिळालेली रोख रक्कम आणि देयके ‘डी. जे. ट्रेडिंग’च्या नावे वळवली.

सट्टेबाजीमध्ये गुंतवणूक
गेल्या वर्षभरात या टोळीने अशा प्रकारे २.७५ कोटी रुपयांच्या तांदळाचा अपहार केला. ‘श्री व्यंकटेश्वरा कॉर्पोरेशन’ला ही बाब समजल्यानंतर त्यांनी तपास केला असता, एजंट जिग्नेश गजरा याने बुकी विपुल दामा, दीप गोरी, चेतन भद्रा, नरेश, मोहित भद्रा आणि हर्ष यांच्याशी संगनमत करून ही फसवणूक केल्याचे आणि सर्व रक्कम आयपीएल क्रिकेट सट्टेबाजीमध्ये गुंतवल्याचे निष्पन्न झाले. एपीएमसी पोलिसांनी जिग्नेश गजरासह सर्व बुकींविरोधात गुन्हा दाखल केला असून, त्यांचा शोध सुरू आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Prakash Ambedkar: प्रकाश आंबेडकरांना म्हाडातून लागलं घर, पण प्रकरण हायकोर्टात; काय दिले निर्देश?

Sant Tukaram Maharaj Beej 2026: संत तुकाराम बीज का साजरी केली जाते अन् तुम्हाला या दिवसाचं महत्त्व माहित आहे का?

Two Killed Electric Shock Hupari : बैलांचा नाद, जिवापाड प्रेम करणाऱ्यारा बैलांना धुताना विजेचा धक्का लागला अन्, हुपरीत दोघांचा जागीच मृत्यू

Nashik Kumbh Mela : 1800 झाडांची कत्तल थांबणार? हायकोर्टाने नाशिक महापालिकेचा 'तो' युक्तिवाद फेटाळला; नेमकं काय घडलं न्यायालयात?

Latest Marathi News Live Update : एसबीआय एनर्जी लिमिटेड कंपनीच्या स्फोटातील आरोपी कंपनी मालक अद्यापही फरार

SCROLL FOR NEXT