उल्हासनगर, ता. २० (बातमीदार) : विजेच्या अनेक समस्यांबाबत मनसेच्या माध्यमातून स्थानिक महावितरणला लेखी, तोंडी; तसेच दूरध्वनीच्या माध्यमातून वारंवार पाठपुरावा करूनही कार्यपद्धतीत सुधारणा करण्यात येत नाही. यासाठी उल्हासनगरातील मनसेने थेट कल्याणच्या तेजश्री महावितरण कार्यालयावर धडक दिली. महावितरणचे मुख्य अभियंता चिंतामणी मिश्रा यांच्याकडे समस्यांचा पाढा वाचला.
शहरात वारंवार खंडित होणारा वीजपुरवठा तत्काळ सुरळीत करण्यात यावा. वर्षानुवर्षे जुने आणि नादुरुस्त असलेले ट्रान्स्फार्मर, सडलेले विजेचे खांब तत्काळ बदलण्यात यावेत. वीजग्राहकाच्या लिखित परवानगीशिवाय स्मार्ट मिटर बसविण्यात येऊ नये. शहरातील अनेक भागांमध्ये कमी क्षमतेचे ट्रान्स्फार्मर बसवले आहेत. त्यामुळे वीजपुरवठा सातत्याने कमी-जास्त होऊन अनेक उपकरणांचे नुकसान होत आहे. वीजबिलांचे वाटप वेळेत करावेत, आदींसह विविध मागण्या करण्यात आल्या. त्या वेळी चिंतामणी मिश्रा यांनी सकारात्मक आश्वासन दिले. या वेळी जिल्हाध्यक्ष बंडू देशमुख, उपजिल्हाध्यक्ष प्रदीप गोडसे, शहराध्यक्ष संजय घुगे, मनविसे शहराध्यक्ष वैभव कुलकर्णी, उपशहराध्यक्ष सचिन बेंडके, मुकेश सेठपलांनी, रस्ते आस्थापनाचे महानगर संघटक मैनऊद्दी शेख वाहतूक सेनेचे काळू थोरात, विभाग अध्यक्ष अनिल गोधडे, कैलास वाघ, कैलास घोरपडे, हितेश मेहरा यांच्यासह राहुल राणे, दीपेश धरिवाल उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.