मुंबई

उल्हासनगरात पीडितांच्या घरासमोर फोडले फटाके

CD

उल्हासनगरात पीडितांच्या
घरासमोर फोडले फटाके

विनयभंग प्रकरणातील आरोपीची मिरवणूक

उल्हासनगर, ता. २० (वार्ताहर) : रमाबाई टेकडी परिसरात विनयभंग प्रकरणात जामिनावर सुटलेल्या आरोपीने चक्क दोन पीडित मुलींच्या घरासमोरून ढोल-ताशांसह फटाके फोडून मिरवणूक काढल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. याप्रकरणी उल्हासनगर पोलिस ठाण्यात रविवारी गुन्हा दाखल झाला आहे. कायद्याला आव्‍हान देणारी ही घटना असल्याचा संताप व्‍यक्त करून नागरिकांनी पोलिसांच्या भूमिकेबाबत नाराजी व्‍यक्त केली.

दोन अल्पवयीन मुलींवर विनयभंग केल्याच्या प्रकरणात रोहित झा याला अटक झाली होती. २७ एप्रिलला मध्यरात्री दोन वाजताच्या सुमारास हंसू झा आणि बिट्टू यादव यांनी एका घराचा दरवाजा ठोठावून जबरदस्तीने आत घुसण्याचा प्रयत्न केला. दरवाजा उघडताच त्यांनी घरातील तरुणाला बेदम मारहाण केली. यानंतर दुसऱ्याच दिवशी हंसू, त्याचा भाऊ रोहित झा आणि सोनपन्नी झा हे तिघे धारदार शस्त्र घेऊन पुन्हा त्या कुटुंबाच्या घरात घुसले. त्या वेळी घरात दोन अल्पवयीन मुली होत्या. आरोपींनी दरवाजा तोडून त्या मुलींना जबरदस्तीने घराबाहेर खेचून त्यांच्या अंगावरील कपडे फाडले आणि त्यांचा विनयभंग केला, अशी माहिती पीडितांनी पोलिसांना दिली. आरडाओरड ऐकून शेजारी जमा झाले आणि आरोपींना पकडून जोरदार चोप दिला. या घटनेनंतर दोन्ही बाजूंनी परस्परविरोधी तक्रारी दाखल झाल्यानंतर आरोपींना अटक करण्यात आली. विनयभंग प्रकरणातील आरोपी रोहित झा याला दोन दिवसांपूर्वी जामीन मंजूर झाला. आधारवाडी कारागृहातून बाहेर पडताच त्याने थेट रमाबाई टेकडी परिसरातील पीडित मुलींच्या घरासमोरून ढोल-ताशा वाजवून, फटाके फोडून मिरवणूक काढली. पोलिस उपायुक्त सचिन गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक विष्णू ताम्हाणे यांनी आरोपी रोहित झा आणि त्याच्या इतर साथीदारांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
---
पीडितांना संरक्षण द्या!
रोहित झा याच्यावर तातडीने प्रतिबंधात्मक कारवाई करून पीडित मुलींना पोलिस संरक्षण देण्याची मागणी सामाजिक संघटना आणि नागरिकांनी केली आहे.
-----
ही घटना अत्यंत गंभीर आहे. पोलिसांनी या घटनेची तत्काळ दखल घेतली आहे. पीडित कुटुंबाला संपूर्ण संरक्षण देण्यात आले असून कोणालाही कायदा हातात घेता येणार नाही. पोलिसांकडून संबंधितांवर कडक कारवाई केली जाईल.
- विष्णू ताम्हाणे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मुंबई विमानतळावर थरार! Air India फ्लाइटचे 3 टायर फुटले; मुसळधार पावसात नेमकं काय घडलं, प्रवाशांची काय स्थिती?

मारहाण भोवली! अजित पवारांचे राजीनाम्याचे आदेश, कोण आहे सुरज चव्हाण?

Mumbai Blast 2006 : पाकिस्तानात कट ते आरोपींची निर्दोष सुटका; २०९ बळी घेणाऱ्या ७/११ साखळी बॉंबस्फोट प्रकरणात आतापर्यंत काय-काय घडलं?

वर ढगाला लागली कळं, AC लोकलच्या डब्यातून पाणी थेंब थेंब गळं; प्रवाशांमधून संतापाची लाट, CM फडणवीसांनाही VIDEO केला टॅग

AAIB Investigation: विमान अपघातांचा तपास होतो कसा?

SCROLL FOR NEXT