मुंबई

‘मैदान गेले, बालपण गेले''

CD

‘मैदान गेले, बालपण गेले!''
सानपाडाकरांची आर्त हाक
जुईनगर, ता. २२ (बातमीदार) : सानपाडा सेक्टर १० येथील कै. डी. व्ही. पाटील खेळाच्या मैदानातील आर्चरी खेळाच्या बांधकामाची निविदा प्रक्रिया रद्द करण्याच्या मागणीकरिता मैदान वाचवा कृती समितीतर्फे मंगळवारी (ता. २२) मोर्चा काढला होता. या मोर्चात सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, कार्यकर्ते, महिला कार्येकर्ते व स्थानिक नागरिकांनी सहभाग घेतला. यासंदर्भात लेखी निवेदन आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांना देण्यात आले. याआधी पालिका विभाग कार्यालय प्रवेशद्वारावर घोषणा देऊन ठिय्या देण्यात आला.
या मैदानात आर्चरी खेळाचे केंद्र विकसित करण्याकरिता नवी मुंबई महापालिकेतर्फे निविदा प्रक्रिया राबविण्यात आली आहे. मात्र आर्चरी खेळापुरते हे मैदान मर्यादित होऊन पारंपरिक आणि सामान्य खेळ खेळता येणार नसल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली. परिसरातील मुलांना खेळासाठी अथवा नागरिकांना विविध कार्यक्रमांसाठी मैदान उरणार नसल्याची भावना स्थानिकांमध्ये निर्माण झाली आहे. यामुळे निविदा रद्द न झाल्यास येत्या काळात तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.
याप्रसंगी सोमनाथ वास्कर, पंकज चौधरी, बाबाजी इंदोरे, सुनील कुरकुटे, अविनाश जाधव राजेश ठाकूर, सुनिक भैसाने, गणपत भापकर, रणजी पाटील, गणेश पावगे, अजित सावंत, अजय पवार आदी मान्यवर व नागरिक मोठ्या संख्येने मोर्चात सहभागी झाले होते.

आर्चरी खेळाला विरोध नाही, तर...
सानपाडा येथील सेक्टर १० आणि ११ येथील मुलांसाठी एकमेव असलेले हे मैदान आर्चरी खेळासाठी झाल्यास परिसरातील मुलांनी कुठे खेळायचे, असा संतप्त सवाल सानपाडाकर करीत आहेत. आर्चरी खेळाला येथील नागरिकांचा विरोध नसून निवडलेले मैदान सोडून इतर ठिकाणी पर्यायी जागा निवडण्याची विनंती येथील नागरिकांनी निवेदनातून केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Solapur Accident: 'ओमिनी कार, टेम्पोच्या धडकेत दाेघे ठार': सोलापूर-पुणे महामार्गावरील घटना; चालकाचे नियंत्रण सुटले अन्..

Crime News : अल्पवयीन मुलीवर जंगलात सामूहिक अत्याचार; नराधमांच्या तावडीतून कशीबशी सुटली, ट्रक ड्रायव्हरनेही तोडले लचके

Pune News : समाविष्ट १६ गावांचा एसटीपी प्रस्ताव मंजूर, मलवाहिन्यांच्या कामासाठी ३३२ कोटी रुपये; विविध कामे मार्गी लागणार

लैंगिक छळाच्या आरोपीची अधिकारी पदी नियुक्ती, जामीनावर आहे बाहेर; वडील भाजप खासदार

Banawadi Water issue: बनवडीचा पाणीप्रश्न कायमस्वरूपी सोडवा; पाणीपुरवठा मंत्र्यांकडे मागणी, सागर शिवदास यांनी घेतली भेट

SCROLL FOR NEXT