मुंबई

युको बॅँकेला ६०७ कोटींचा निव्वळ नफा

CD

युको बॅँकेला ६०७ कोटींचा निव्वळ नफा
मुंबई, ता. २२: युको बॅँकेची व्यवसाय वाढ झाली असून, एकूण व्यवसाय ५,२३,७३६ कोटींवर पोहोचला आहे. यामध्ये वार्षिक १३.५१ टक्क्यांची वाढ नोंदविली आहे. बॅँकेच्या एकूण कर्जामध्ये १६.४८ टक्क्यांनी वाढ झाली असून एकूण ठेवींमध्ये ११.३७ टक्‍क्यांची वाढ नोंदविण्‍यात आली असल्याची माहिती बॅंकेचे मुख्य व्यवस्थापक व मुख्य कार्यकारी अधिकारी अश्वनी कुमार यांनी कोलकत्ता येथील एका कार्यक्रमात देण्यात आली. तिमाही निकाल या वेळी जाहीर करण्यात आला. या बॅँकेच्या देशांतर्गत प्रत्येकी ३,३०५ शाखा तसेच हाँगकाँग आणि सिंगापूर येथे दोन आणि इराणमध्ये एक असे प्रतिनिधी कार्यालय आहे.
यंदाच्या तिमाहीसाठी निव्वळ नफा ६०७ कोटी झाला असून, मागील वर्षीच्या कालावधीत ५५१ कोटींच्या तुलनेत १०.१६ टक्के वाढला आहे. तर ऑपरेटिंग नफा १,५६२ कोटी झाला असून, मागील वर्षीच्या १,३२१ कोटींच्या तुलनेत १८.२४ टक्के वाढला आहे. खासगी, कृषी व एमएसएमई क्षेत्रांतील कर्जवाढ विभागात प्रतिवर्षी २३.४७ टक्के होऊन १,२५,९२७ कोटी पर्यंत पाेहोचली आहे. खासगी कर्जात ३०.७३ टक्के, कृषी कर्जात १५.४६ टक्के आणि एमएसएमई कर्जात २०.३३ टक्के वाढ झाली आहे.
बॅंकेचा एकूण व्यवसाय तिमाहीत ५,२३,७३६ कोटींवर पोहोचला असून, मागील वर्षाच्या तुलनेत ४,६१,४०८ कोटी, १३.५१ टक्यांनी वाढ झाली आहे. तसेच एकूण ठेवी ११.३७ टक्यांनी वाढल्या असून २,९८,६३५ कोटींपर्यंत पाेहोचल्या आहेत. खासगी कर्जवाढ ५६,१९५ कोटी झाली असून, ३०.७३ टक्क्यांनी वाढली आहे. ही वाढ मुख्यतः गृहकर्ज व वाहन कर्जामधील वाढीमुळे झाली आहे. यामध्ये अनुक्रमे १७.९२ टक्के आणि ६६.९४ टक्के वाढ झाली आहे.
कृषी कर्जवाढ २९,९६१ कोटी नाेंदवली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Wilful Defaulters: सर्वसामान्यांच्या पैशांवर डल्ला! 1,62,000 कोटींचे कर्ज बुडणार? सरकार काय कारवाई करणार?

Latest Maharashtra News Updates : लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार नितीन गडकरी यांना जाहीर

AB De Villiers: ४१ वर्षीय डिव्हिलियर्सची आक्रमक फिफ्टी अन् अफलातून झेल... युसूफ पठाणची विकेट अन् भारतीय स्तब्ध Video Viral

Thane Tourists Rescued : तावली पर्वतावर मुंबईतील चार पर्यटक भरकटले; मोबाईल टॉर्चच्या उजेडात पोलिसांनी घेतला चौघांचा शोध

Solapur: हातभट्टीमुळे पती गेला,मुलगाही त्याच वाटेवर; पोलिसांकडे हातभट्ट्यांच्या ठिकाणांची माहिती, तरी नाही कारवाई

SCROLL FOR NEXT