मुंबई

महिलांना मिळाली रोजगाराची संधी

CD

बदलापूर, ता. २२ (बातमीदार) : उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस बदलापूर यांच्या माध्यमातून विविध सामाजिक उपक्रम राबवण्यात आले होते. या वेळी प्रदेश सरचिटणीस तथा परशुराम आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष कॅप्टन आशीष दामले यांच्या माध्यमातून महिलांना रोजगार मिळावा या उद्देशाने शिलाई मशीनचे वाटप करण्यात आले.
आर्थिकदृष्ट्या घरातील महिलेचे सबलीकरण करण्यासाठी आणि महागाईत गृहिणींनाही रोजगार उपलब्ध व्हावा, या उद्देशाने उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून बदलापूर शहरात अनंत भवन येथे गरजू महिलांना शिलाई मशीनचे वाटप केले. या वेळी चांगल्या दर्जाच्या आणि अद्ययावत शिलाई मशीन वाटप केल्या. या माध्यमातून शिलाई कामातून चार पैसे कमावून महिला स्वावलंबी आणि आपल्या कुटुंबाचा आधार होऊ शकतील. त्याचबरोबर बदलापूर शहरातील ग्रामीण वस्तीमधील, इतर आदिवासी मुलांना खाऊचे वाटप करण्यात आले. या उपक्रमाला राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष प्रभाकर पाटील, ठाणे ग्रामीण युवती अध्यक्षा प्रियांका दामले, अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री अजित पवार आदर्शवत व्यक्तिमत्त्व आहेत. त्यांच्याकडून राजकारणापेक्षाही समाजकार्य कसे करता येईल, याचे धडे गिरवले आहेत. स्पष्टवक्तेपणा आणि वेळेची किंमत ओळखून काम करणाऱ्या नेत्याचा वाढदिवस म्हणजे ऊर्जा देणारा दिवस आहे. यासाठी हा वाढदिवस सामाजिक उपक्रम राबवून साजरा करण्याचे ठरवले. यापुढेही समाजासाठी जे करता येईल ते करत चांगले राजकारण करण्याचा मानस आहे.
- आशीष दामले, प्रदेश सरचिटणीस, राष्ट्रवादी,
परशुराम आर्थिक विकास महामंडळ (अध्यक्ष)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Wilful Defaulters: सर्वसामान्यांच्या पैशांवर डल्ला! 1,62,000 कोटींचे कर्ज बुडणार? सरकार काय कारवाई करणार?

Latest Maharashtra News Updates : लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार नितीन गडकरी यांना प्रदान

AB De Villiers: ४१ वर्षीय डिव्हिलियर्सची आक्रमक फिफ्टी अन् अफलातून झेल... युसूफ पठाणची विकेट अन् भारतीय स्तब्ध Video Viral

Thane Tourists Rescued : तावली पर्वतावर मुंबईतील चार पर्यटक भरकटले; मोबाईल टॉर्चच्या उजेडात पोलिसांनी घेतला चौघांचा शोध

Solapur: हातभट्टीमुळे पती गेला,मुलगाही त्याच वाटेवर; पोलिसांकडे हातभट्ट्यांच्या ठिकाणांची माहिती, तरी नाही कारवाई

SCROLL FOR NEXT