मुंबई

धाटाव एमआयडीसी क्षेत्रात वायू प्रदूषण,झाडं कोमजली, पर्यावरण प्रेमींनी व्यक्त केला संताप

CD

वायू प्रदूषणामुळे झाडे कोमेजली
धाटाव एमआयडीसीतील प्रकार; पर्यावरणप्रेमींनी व्यक्त केला संताप
रोहा, ता. २३ (बातमीदार) ः धाटाव औद्योगिक वसाहतीत दिवसेंदिवस वाढणाऱ्या वायू प्रदूषणामुळे परिसरातील झाडे कोमेजत आहेत. झाडांवरील पाने पिवळी-काळी पडत आहेत, तर काही झाडे पूर्णपणे वाळण्याच्या मार्गावर आहेत. या पर्यावरणीय संकटामुळे स्थानिक पर्यावरणप्रेमी आणि रहिवाशांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.
औद्योगिक वसाहतीत काही रासायनिक कारखान्यांकडून सुरू असलेल्या मोठ्या प्रमाणावर धूर, धूलिकण आणि रासायनिक वायू हवेत मिसळत आहेत. या प्रदूषित हवेमुळे केवळ झाडेच नाहीत, तर मानवाच्या आरोग्यावरही गंभीर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. संबंधित प्रशासनाने याकडे लक्ष देऊन त्वरित वायू प्रदूषण करणाऱ्या कंपन्यांवर सक्त कारवाई करावी, अशी मागणी स्थानिक जनतेतून होत आहे. जल आणि वायू प्रदूषणाबाबत येथील ग्रामस्थांनी आणि सामाजिक संघटनांनी प्रदूषण नियंत्रण मंडळ कार्यालयाकडे अनेकदा लेखी तक्रारी केल्या आहेत, मात्र संबंधित विभागाकडून अद्यापही ठोस कारवाई झालेली नाही. त्यामुळे प्रशासनाच्या या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. दरम्यान, कारखाने राजरोसपणे वायू प्रदूषण करतात. अशा कारखान्यावर महाराष्ट्र प्रदूषण मंडळाने कारवाई केलीच पाहिजे, नाहीतर भारतीय जनता पक्षाकडून उत्तर देऊ, असा इशारा भाजपचे कार्यकर्ते सागर जोगडे यांनी दिला आहे.

पाने गळून पडली
येथील बेक केमिकल व निरलॉन कंपनीजवळ असणाऱ्या करंज झाडावर याचा जास्त प्रमाणात प्रादुर्भाव दिसून येत आहे. या झाडाची पाने पिवळी, काळी पडलेली दिसत असून, त्यामुळे पाने गळून पडली आहेत.

हवेची गुणवत्ता तपासणार
ज्या ठिकाणी झाडांची अशी परिस्थिती दिसून येत आहे, तिथे आल्यानंतर पंचनामा करून अहवाल वरिष्ठांकडे सादर केला जाईल व हवेची गुणवत्ता तपासली जाईल, अशी माहिती महाराष्ट्र प्रदूषण मंडळाचे अधिकारी मिलिंद औटी यांनी दिली आहे.
फोटो कॅप्शन : वायू प्रदूषणमुळे धाटाव एमआयडीसी येथील कोमेजलेली झाडांची पाने दिसत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Student Video: बोटांमध्ये चावी फिरवत वर्गातून बाहेर पडली, नंतर थेट मुलीनं शाळेत चौथ्या मजल्यावरून उडी मारली, पाहा थरारक व्हिडिओ

Walmik Karad: ''धनंजय मुंडेंना आयुष्यातून उठवून मंत्रिपदाची शपथ घेणार होता वाल्मिक कराड'', बाळा बांगरचा रेकॉर्डिंग बॉम्ब

IND vs ENG 4th Test: 'Root' मजबूत! जो रूटचे ३८वे शतक; भारतीय गोलंदाजांची घेतली शाळा, मोडले अनेक विक्रम

Pune: पुण्यातील मोठ्या धरणाच्या पाण्याला हिरवा रंग, लोकांमध्ये भीतीचं वातावरण, धक्कादायक कारण समोर

Latest Maharashtra News Updates : माणिकराव कोकाटे यांच्या समर्थनार्थ सिन्नरमध्ये शक्तीप्रदर्शन

SCROLL FOR NEXT