मुंबई

मुख्याध्यापक, स्त्री अधिक्षिका सक्तीच्या रजेवर

CD

मुख्याध्यापक सक्तीच्या रजेवर
किन्हवली, ता. २३ (बातमीदार) : गोकुळगाव (आंबिवली) येथील शासकीय आदिवासी आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या पोषण आहार, आरोग्य व शिक्षण सुविधांबाबत झालेल्या तक्रारींच्या पार्श्वभूमीवर मुख्याध्यापक व स्त्री अधीक्षिकेला आठ दिवसांच्या सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आले आहे. तसेच दोघांनाही ‘कारणे दाखवा’ नोटीस बजावण्यात आली असून, खुलासा आल्यानंतर त्यानुसार प्रशासकीय कारवाईची शिफारस वरिष्ठ कार्यालयाकडे करण्यात येणार आहे.

ही कारवाई मार्क्सवादी लेनीनवादी पक्षाच्या (लाल बावटा पक्ष) कार्यकर्त्यांनी नुकतीच शाळेला दिलेल्या भेटीनंतर पुकारलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर झाली आहे. त्यांनी विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या सुविधा अत्यंत दुय्यम दर्जाच्या असल्याचा आरोप करत बुधवारी (ता. २३) आंदोलन पुकारले होते; मात्र प्रकल्प अधिकारी राजेंद्रकुमार हिवाळे यांनी मंगळवारी (ता. २२) संघटनेच्या शिष्टमंडळासोबत बैठक घेऊन आंदोलन स्थगित करण्याची विनंती केली होती. प्रकल्प अधिकाऱ्यांनी या वेळी शिष्टमंडळाला दिलेल्या माहितीनुसार, शाळेच्या स्वच्छता, शौचालय, स्नानगृह आणि अन्य सुविधांमध्ये सुधारणा करण्यात आली आहे, मात्र संघटनेने स्पष्ट केले आहे की आठ दिवसांत दोषींवर ठोस कारवाई न झाल्यास मोठ्या प्रमाणात जनआंदोलन छेडले जाईल.

आश्रमशाळेबाबत तक्रारी
गोकुळगाव-आंबिवली येथे एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाची पहिली ते दहावीपर्यंतच्या आदिवासी विद्यार्थ्यांसाठी शासकीय माध्यमिक आश्रमशाळा आहे. मुले व मुली अशी मिळून ३५७ विद्यार्थी पटसंख्या आहे. शाळेत विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या पोषण आहार व आरोग्य, शिक्षण व इतर सुख सुविधांबाबतीत कोणतीच काळजी घेतली जात नाही. आश्रमशाळेबाबत अनेक तक्रारी आल्यानंतर मार्क्सवादी लेनीनवादी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी १६ जुलैला पाहणी केली. पाहणी दौऱ्यात कुजलेला भाजीपाला, अशुद्ध पाणी, अस्वच्छ स्नानगृहे, घाणीचे शौचालय, गरम पाण्याचा अभाव दिसला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai-Pune Expressway: मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरील वाहतूक ठप्प; बोरघाटात कोसळली दरड

IND vs ENG 4th Test: तू आता ओव्हर टाकू नकोस...! Jasprit Bumrahला अम्पयारने रोखले; सिराजही मैदानाबाहेर, नेमके काय घडले?

Wolf Hour: तुम्हालाही रोज पहाटे ३-५ च्या दरम्यान जाग येते? मग शरीर देत असलेल्या या सिक्रेट सिग्नल्सकडे दुर्लक्ष करू नका

अय्यो! सायलीच्या जागी मालिकेत उभी राहिली दुसरीच मुलगी; नेटकऱ्यांनी ओळखली पाठमोऱ्या जुईची ती खूण

Thane Traffic: ठाणेकरांची 143 तास होणार कोंडी, गर्डरच्या कामासाठी 'या' मार्गावर नऊ दिवसांचा मेगाब्लॉक

SCROLL FOR NEXT