मुंबई

कोकण युवा प्रतिष्ठानतर्फे कोकणरत्नांचा सन्मान

CD

कोकण युवा प्रतिष्ठानतर्फे कोकणरत्नांचा सन्मान
कल्याण, ता. २४ (वार्ताहर) : कोकणच्या समृद्धीसाठी कोकण भूमी प्रतिष्ठानच्या माध्यमातून अनेक वर्षांपासून कार्यरत असलेले संजय यादवराव यांना कोकण युवा प्रतिष्ठानच्या वतीने कोकणभूषण पुरस्काराने रविवारी (ता. २०) गौरविण्यात आले. या वेळी साहित्य अकादमी युवा पुरस्कार विजेते प्रदीप कोकरे (कोकण साहित्यरत्न) व अन्य मान्यवरांना कोकणरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
दिग्दर्शक, लेखक राजेश देशपांडे (कला), रोहित शर्माचे प्रशिक्षक दिनेश लाड (क्रीडा), अजय आयरे (उद्योग), संदीप परटवलकर (शिक्षण), पोलिस सेवेतील मनीष शिंदे (शौर्य), काजूची नवी जात विकसित करणारे अमर खामकर (कृषी), श्रद्धा कळंबटे (सामाजिक) यांनाही कोकणरत्न पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले. डोंबिवली येथील मराठा मंदिर संस्थेच्या सभागृहात झालेल्या कार्यक्रमात कोकणातील सामाजिक चळवळींचा आधारस्तंभ आणि राजापूर- लांजा तालुका नागरिक संघाचे अध्यक्ष सुभाष लाड, शिव प्रतिष्ठानचे अध्यक्ष सुहास चव्हाण यांच्या हस्ते हे पुरस्कार वितरित करण्यात आले.
या वेळी उद्योजक सुनील नारकर, मंदार हळबे, राहुल कामत, मराठा मंडळाचे पदाधिकारी आदी मान्यवर उपस्थित होते. या वेळी विविध क्षेत्रांत काम करणाऱ्या गुणवंतांचाही गौरव करण्यात आला. सी. ए. परीक्षेत देशात तिसरा आलेल्या शार्दूल विचारे याचाही विशेष सत्कार करण्यात आला. माजी विश्वस्त श्रीराम चाळके यांचाही सन्मान करण्यात आला. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी खजिनदार रोहन मोरे, कुणाल मोरे, शुभम केगडे, साहिल मोरे यांनी प्रयत्न केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Garden Waste Scam : पुणे महापालिकेच्या उद्यान कचरा प्रकल्पात ३८ कोटींचा गैरव्यवहार? माजी नगरसेवकांचा ठेकेदारावर गंभीर आरोप

Police Negligence: संशयिताऐवजी भलत्यालाच अटक; ज्येष्ठाची ८८ दिवस कारागृहात ससेहोलपट ; राष्ट्रवादीचे प्रवक्ते विकास लवांडे यांचा आरोप

NEET Protest: बिहार सरकार आंदोलकांसमोर झुकलं! गुन्हे मागे घेण्याचा निर्णय, अटकेत असलेल्यांची सुटका

RTE Admissions Probe: आरटीई प्रवेशातील गैरप्रकारांवर सर्वत्र चौकशी; जिल्हा परिषद अध्यक्ष वीरधवल जगदाळे यांची सभेत ग्वाही

Pune HCMTR Ring Road : पुण्यातील वाहतूक प्रकल्पांना गती; एचसीएमटीआर, रिंगरोड व पाताळलोक बोगद्यांसाठी मुख्यमंत्र्यांचे स्पष्ट आदेश

SCROLL FOR NEXT