मुंबई

लोकल साखळी बॉम्बस्फोट आरोपी मोकाट, रेल्वे सुरक्षाही वाऱ्यावर

CD

रेल्वेस्थानकांची सुरक्षा वाऱ्यावर
७/११, २६/११ हल्ल्यानंतरही प्रशासनाचे दुर्लक्ष
मुंबई, ता. २४ : मुंबईत २००६ साली लोकल साखळी बॉम्बस्फोट प्रकरणात सर्व आरोपींची उच्च न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली. मुंबईला हादरवणारे हे बॉम्बस्फोट पश्चिम रेल्वेवरील सात रेल्वेस्थानकादरम्यान उपनगरी रेल्वेच्या प्रथम श्रेणीच्या डब्यात घडवण्यात आले होते. त्यानंतर २६/११च्या दहशतवादी हल्ल्यावेळीही मुंबईतील रेल्वेस्थानकांवरील ढिसाळ सुरक्षा व्यवस्थेचा प्रश्‍न ऐरणीवर आला. त्यानंतर रेल्वेस्थानकांची सुरक्षाव्यवस्था भक्कम करण्याचा सरकारने निर्णय घेतला. रेल्वे स्थानकांच्या प्रवेशद्वारावर मेटल डिटेक्टर, सीसीटीव्ही कॅमेरे, बॅग तपासणी यंत्रणा तसेच अतिरिक्त सुरक्षेसाठी होमगार्डची नेमणूक करण्यात आली; मात्र काही वर्षांतच ही सुरक्षाव्यवस्था पूर्णपणे सुस्तावल्याचे चित्र आहे. त्याच पार्श्‍वभूमीवर ‘सकाळ’ने साखळी बॉम्बस्फोट झालेल्या सात रेल्वेस्थानकांसह मुंबईतील महत्त्वाच्या रेल्वेस्थानकांवरील सुरक्षा व्यवस्थेचा घेतलेला आढावा...
....

१) वांद्रे
- पोलिस, सुरक्षा रक्षक, मेटल डिटेक्टर नाही.
- फलाट क्रमांक एकच्या सरकत्या जिन्याखाली काही जण झोपलेले पाहायला मिळाले. ते कुठून आले, याचा कुणालाच थांगपत्ता नाही.
- सुरक्षा रक्षकाचे बाकडे सुलभ शौचालयातील कर्मचारी वापरत असल्याचे चित्र आहे.
- वांद्रे रेल्वेस्थानकाला पूर्व आणि पश्चिमेला जोडणाऱ्या पुलाला जोडून उभ्या असलेल्या झोपड्या अद्यापही तशाच आहेत.

२) खार
- खार रेल्वेस्थानकात कुठेही सुरक्षा रक्षक नाही.
- भिकारी, गर्दुल्ले यांचा वावर अधिक आहे.
- वांद्रे टर्मिनसला जोडणाऱ्या पादचारी पुलावर सुरक्षिततेच्या दृष्टीने सोय नाही.

३) बोरिवली स्थानक
- स्थानकाच्या सातही प्रवेशद्वारांवर कसलीही चौकशी नाही.
- मेटल डिटेक्टर नाही
- बॅग स्कॅनर बंद
- सुरक्षा रक्षकांची कमतरता

४) जोगेश्वरी स्थानक
- कोणतीही सुरक्षा तपासणी नाही.
- मेटल डिटेक्टर नाही.
- बॅग स्कॅनर मशीन नाही.
- स्थानकात भिकाऱ्यांचा वावर आहे.

५) मिरा-भाईंदर
- मेटल डिटेक्टर किंवा बॅग स्कॅनर नाही.
- प्रवेशद्वारावर तपासणी किंवा चौकशी होत नाही.
- रेल्वे पोलिस-आरपीएफ आहेत; मात्र सुरक्षा सजगता दिसून येत नाही.

६) माहीम
- फक्त एकाच फलाटावर दोन पोलिस दिसले.
- मेटल डिटेक्टर यंत्रणा नाही.
- प्रवेशद्वारावर सुरक्षेचा अभाव आहे.

७) माटुंगा रोड
- मेटल डिटेक्टर यंत्रणा नाही.
- फलाटावर असलेल्या पोलिस बाकांवर कुणीच नव्हते.
- कुठेही पोलिस बंदोबस्त नाही.
------------------------------------------------

मुंबईतील इतर महत्त्वाच्या स्थानकांवरील परिस्थिती
१. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस
- स्थानकात अनेक ठिकाणी मेटल डिटेक्टर बंद तर बॅग स्कॅनर संख्या अपुरी
- बहुतेक कर्मचारी बाकांवर बसून मोबाइलमध्ये व्यस्त
- सीएसएमटी स्थानकावर असलेले अनेक प्रवेशद्वारे पूर्णपणे उघडी आहेत.
- कुठेही सुरक्षा चौकी किंवा सुरक्षा कर्मचारी तपासणी करताना दिसत नाहीत.

२. चर्चगेट
- अनेक प्रवेशद्वारांवरील मेटल डिटेक्टर बंद
- पोलिस कर्मचारी (जीआरपी/आरपीएफ) एकत्र एकाच कोपऱ्यात बाकड्यावर बसून
- काही जवान मोबाइलमध्ये गुंतलेले किंवा गप्पा मारताना आढळले.
- संपूर्ण परिसरात सुरक्षा रक्षकांची अनुपस्थिती जाणवते.

३. दादर
- फलाट क्रमांक सहावर मेटल डिटेक्टर नाही.
- पश्चिम रेल्वेच्या फलाट क्रमांक एकवर मेटल डिटेक्टर नाही.
- बॅग स्कॅनरही नाही.
- मध्य रेल्वे परिसरात दादर टर्मिनस येथे बॅग स्कॅनर बंद पडल्याने काढून टाकले.
- तिकीट खिडकी परिसरात मेटल डिटेक्टर बंद

४. कुर्ला
- प्रवेशद्वारावर ना मेटल डिटेक्टर, ना सुरक्षा कर्मचारी
- तिकीट खिडकीसह फलाटावर ठिकठिकाणी बनवलेल्या बंकरमधील सुरक्षा रक्षकही गायब
- नेहरूनगर आणि कसाईवाडा अशा दोन प्रवेश मार्गिकेवर तपासणीची व्यवस्था नाही.

५. मुंबई सेंट्रल
- देशभरातून येणाऱ्या प्रवाशांची व पार्सलची मोठी वर्दळ
- प्रवेशद्वारांवर कोणतीही तपासणी नाही.
- मेटल डिटेक्टर अपुरे, जिथे आहेत तिथेही तपासणी नाही.

६. घाटकोपर
- मेट्रो-१ आणि मध्य रेल्वेवरील महत्त्वाचे स्थानक असल्याने नेहमीच गर्दी
- एकाही प्रवेशद्वारावर पोलिस बंदोबस्त नाही.
- मेटल डिटेक्टर नाहीत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मुंबई-पुणे 'एक्स्प्रेस वे'वर भीषण अपघात! सात ते आठ वाहनं एकमेकांना धडकली, एका महिलेचा मृत्यू

IND vs ENG 4th Test: बेन स्टोक्सचे खणखणीत शतक! भारतीय गोलंदाज प्रयत्न करून दमले, इंग्लंडसाठी नवा इतिहास रचला

Shukra Bhraman 2025 : मिथुन राशीतील शुक्राचं भ्रमण या राशींना देणार भरपूर लाभ; राशीनुसार जाणून घ्या परिणाम

Manikrao Kokate : 'रमी' वाद भोवला: धुळ्यात कृषिमंत्री कोकाटे यांना काळे झेंडे व पत्त्यांच्या माळा दाखवून निषेध

Ganesh Naik: पालघरमध्ये वन उद्यान निर्माण होणार, पालकमंत्र्यानी प्लॅनच सांगितला

SCROLL FOR NEXT