मुंबई

डायमंडचे विद्यालय चमकत राहील : समीर शेडगे

CD

डायमंडचे विद्यालय चमकत राहील : समीर शेडगे
रोहा, ता. २४ (बातमीदार) ः आज सर्वत्र शैक्षणिक संस्था वाढत चालल्या आहेत. मुस्लिम समाजातील मुली-मुले मोठ्या प्रमाणात उच्च शिक्षण घेत आहेत. अष्टमी येथील डायमंड एज्युकेशनल अँड वेल्फअर असोसिएशनच्या माध्यमातून सुरू असलेले मेहबूब स्कूल हे विद्यालय आपली दिवसेंदिवस गुणवत्ता वाढवत आहे. हिरा जरा चमकतो, तशा पद्धतीने या डायमंड संस्थेची शाळा शैक्षणिक क्षेत्रात चमकत राहील, असे गोरवोद्गार रोह्याचे माजी नगराध्यक्ष समीर शेडगे यांनी काढले.
डायमंड एज्युकेशन अँड वेल्फअर असोसिएशन संचालित मेहबूब स्कूलला जनार्दन शेडगे मित्र मंडळाच्या वतीने नवीन बॅंचेस, लॉकर्स व शैक्षणिक साहित्य देण्यात आले. या कार्यक्रमाचे औचित्य साधून शाळेत आयोजित छोटेखानी कार्यक्रमाप्रसंगी समीर शेडगे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. डायमंड संस्थेचे संस्थापक अध्यक्ष जाफरखान देशमुख यांनी लावलेले रोपटे आता वटवृक्ष म्हणून नावारूपाला आला आहे. आम्हाला माहीत आहे, की इंग्रजी शाळा सुरू करणे सोपे आहे; पण चालविणे खूप कठीण आहे, म्हणून मी आणि संतोष पोटफोडे या पुढे एकत्र येऊन तरुण पिढीच्या उज्ज्वल भवितव्यासाठी निश्चितच काम करणार, अशी ग्वाही माजी नगराध्यक्ष समीर शेडगे यांनी दिली. डायमंड शाळेच्या पायाभरणी पासून मी मुस्लिम समाजाच्या सोबत आहे. खासदार सुनील तटकरे यांच्या अथक प्रयत्नाने या भागात इंग्रजी शाळेबरोबर उर्दू माध्यमिक शाळा इमारतदेखील बांधून देण्यात आली आहे. या शाळेकडेदेखील समीर आणि मी जातीने लक्ष देऊ, असे सांगत समीर शेडगे यांच्या समाजकार्याला माजी नगराध्यक्ष संतोष पोटफोडे यांनी मनापासून शुभेच्छा दिल्या. या वेळी प्रमुख अतिथी माजी नगराध्यक्ष संतोष पोटफोडे, समाजसेविका डॉ. अवनी समीर शेडगे, ट्रस्टचे सदस्य सचिन शेडगे, डायमंड संस्थेचे अध्यक्ष समीर दर्जी, उपाध्यक्ष खालिद बेबन, समाज अध्यक्ष शफी पानसरे, खजिनदार मुनवर पठाण, सचिव अफसर करजिकर, अष्टमी ग्रामस्थ मंडळ अध्यक्ष महादेव साळवी, अरिफ पठाण तसेच जामे मशीद अष्टमीचे आजी माजी पदाधिकारी सदस्य, डायमंड संस्थेचे सदस्य व अष्टमी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. या वेळी संस्थेच्या वतीने समीर शेडगे यांना भेटवस्तू व शाल देऊन सन्मानित करण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tata Products: महागाईचा आणखी एक झटका! टाटा चहा, मीठ, डाळींचे दर वाढवणार; सर्वसामान्यांच्या खिशाला फटका बसणार

IND vs ZIM 3rd T20I: वैभव सूर्यवंशीचं शतक थोडक्यात हुकलं, पण विश्वविक्रम रचला! क्रिकेट इतिहासात असा पराक्रम करणारा पहिलाच ठरला

प्रदूषणामुळे वाढतोय 'डिमेंशिया'चा धोका; जीवनशैलीत करा 'हे' बदल! WHO ने सांगितले उपाय...

Kharpudi Bridge Flood : तीन दिवसांपासून पुलावरून पाणी; खरपूडी बुद्रुक-खुर्दचा संपर्क तुटला, ग्रामस्थांना १२ किमीचा वळसा

आगामी विधानसभा निवडणूक लढणार नाही! माजी मुख्यमंत्र्याची मोठी घोषणा, सक्रीय राजकारणातून निवृत्ती जाहीर...

SCROLL FOR NEXT