मुंबई

राजकीय दबावापोटी सहाय्यक आयुक्तांची पक्षपातीपणे कारवाई ?

CD

दोन जणांना नोटीस; कारवाई एकावरच
केडीएमसीच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित
कल्याण, ता. २४ (वार्ताहर) : कल्याण डोंबिवली महानगरपालिका नेहमीच कोणत्या ना कोणत्या वादात असते. आताही एकाच ठिकाणी असलेल्या दोन जणांना कारवाईची नोटीस देण्यात आली, मात्र राजकीय दबावाखाली सहाय्यक आयुक्तांनी केवळ एकावरच कारवाई केली असल्याचा आरोप बाधित जागामालकाने केला आहे. यामुळे केडीएमसीच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
कल्याण पश्चिमेतील गोल्डन पार्कसमोरील प्रस्तावित डीपी रस्त्यात अजय सावंत यांची जागा असून, या ठिकाणी त्यांनी पत्रे लावले होते. रस्त्यात बाधित होणाऱ्या या जागेबाबत सावंत यांना केडीएमसीने नोटीस जारी केली होती. याच जागेच्या समोरील सावंत यांच्या जागेत एकाने अतिक्रमण करत जिम सुरू केली होती. याबाबत सावंत यांनी केडीएमसीला तक्रारी केल्या, मात्र तरीदेखील केडीएमसी कारवाई करत नसल्याने त्यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. न्यायालयाच्या आदेशानंतर केडीएमसीने संबंधितांना केवळ नोटीस दिली. दोन्ही ठिकाणी एकाच वेळी कारवाई करण्यात येईल, असे केडीएमसीकडून सांगण्यात आले, मात्र केडीएमसीच्या क प्रभागाचे सहाय्यक आयुक्त धनंजय थोरात यांनी कारवाई केवळ अजय सावंत यांच्या पत्र्यांवर केली.
याबाबत धनंजय थोरात यांना विचारले असता राजकीय दबाव असल्याने आपण त्यांच्यावर कारवाई करू शकत नसल्याचे उत्तर दिल्याचे सावंत यांनी सांगितले. अशा प्रकारे राजकीय दबावापोटी पक्षपातीप्रमाणे कारवाई केडीएमसी करणार असेल, तर सर्वसामान्यांना न्याय कसा मिळणार, असा सवाल नागरिक उपस्थित करत आहेत.

सहाय्यक आयुक्त म्हणतात...
तर याबाबत सहाय्यक आयुक्त धनंजय थोरात यांना विचारले असता, रस्त्यांची कारवाई ही प्रथम प्रस्तावित होती. यानुसार कारवाई केली असून, समोरील जागेत असलेल्या जिमवरदेखील कारवाई केली जाणार असून, आपल्यावर राजकीय दबाव असल्याचे आपण बोललो नसल्याचे त्यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Petrol Diesel Price Today : कच्च्या तेलाच्या किमतीत पुन्हा वाढ ! पेट्रोल-डिझेलच्या दरातही बदल ? जाणून घ्या तुमच्या शहरातील आजचे ताजे दर

Nagpur News: संघ मुख्यालयबाबत आक्षेपार्ह पोस्ट; युजरविरोधात कोतवाली ठाण्यात गुन्हा दाखल

Latest Marathi News Update : शिंदेंच्या नेत्याचा अपघाती मृत्यू, माजी जिल्हाप्रमुखावर घातपाताचा आरोप

Farmer Loan Waiver : कोल्हापुरात २३ हजार ३१६ शेतकऱ्यांना कर्जमाफी, पहिल्या टप्प्यातील लाभार्थ्यांची यादी प्रसिद्ध

IND vs ZIM 2nd T20I : फक्त ४ धावा अन् तिलक वर्मा जाऊन बसला रोहित शर्मा, विराट कोहलीसह 'त्या' ८ जणांच्या स्पेशल लिस्टमध्ये

SCROLL FOR NEXT