मुंबई

मुरबाड-झाडघर बससेवा बंद

CD

टोकावडे, ता. २४ (बातमीदार) : मुरबाड ते मोहवाडी, झाडघर, चासोळे, जडई, फांगळोशी या मार्गावरील एसटी बस सेवा दोन महिन्यांपासून बंद आहे. याचा फटका अनेक विद्यार्थ्यांना बसत असून दररोज शाळा-महाविद्यालयांत जाण्यासाठी हाल सहन करावे लागत आहेत.
सकाळी व दुपारी या भागातून बस सेवा उपलब्ध नसल्याने अनेक विद्यार्थी वेळेवर शाळा गाठू शकत नाहीत. दुपारी सुटल्यावर वाहनांची सोय नसल्यामुळे काहींना पायी प्रवास करावा लागतो, तर काहींना खासगी वाहने शोधावी लागतात. त्यामुळे वेळ, पैसा आणि शारीरिक त्रास यांचा त्रिप्पट ताण विद्यार्थ्यांवर येत आहे. घरी पोहचण्यास विलंब होत असल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असून मानसिक तणाव वाढत आहे.

झाडघर-मोहवाडी दरम्यानचा अडीच ते तीन किलोमीटरचा रस्ता नुकताच काँक्रीट करण्यात आला आहे. मात्र, साईड भराव न केल्याने मोठ्या वाहनांची वाहतूक अडथळ्याची झाली आहे. त्यामुळेच एसटी प्रशासनाने तात्पुरती सेवा थांबवली असल्याचे मुरबाड बस आगाराकडून सांगण्यात येते. याचा नाहक त्रास मात्र विद्यार्थी, पालक आणि ग्रामस्थांना सहन करावा लागत आहे.

----
मोहवाडी-झाडघर-जडई - चासोळे परिसरातील विद्यार्थ्यांना बस बंद असल्यामुळे सकाळची शाळा वेळेवर मिळत नाही. दररोज एक तास मुले उशिरा पोहोचतात, टोकावडे, शिवळे येथे जाणाऱ्या मुलांचे खूप हाल होत आहेत. त्यामुळे बस सेवा तत्काळ सुरू करावी.
- नंदकुमार राऊत, ग्रामस्थ चासोळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

''कॅमेऱ्याचा एँगल नाही, हृदयाचा एँगल बदला'', भर सभागृहात प्रियंका गांधींकडून मोदींवर बोचरी टीका; नेमकं काय म्हणाल्या?

Mumbai Crime: MIDC पोलिसांची मोठी कारवाई, अवैधरीत्या मुंबईत राहणारे ७ बांगलादेशी तृतीयपंथी जेरबंद; सेक्स रॅकेटचाही पर्दाफाश

Kasari Green Revolution: कासारी गावातील ओसाड गायरानात १००० रोपांची लागवड; ५००० झाडांचे लक्ष्य, ठिबक सिंचनासह हरित क्रांतीचा संकल्प

Mumbai News: रेल्वे स्थानकावर मोठा अपघात टळला, उल्हासनगर-अंबरनाथ दरम्यान विचित्र प्रकार; नेमकं काय घडलं?

Chitrakoot Crime News: NEET विद्यार्थिनीवर सामूहिक अत्याचार; चित्रकूटमध्ये ३७४ CCTV, ६ हजार कॉल्स तपासले, मुख्य आरोपी पोलिसांच्या चकमकीत जखमी

SCROLL FOR NEXT