मुंबई

संतश्रेष्ठ नामदेवांचा ६७५ वा समाधी सोहळ्याला प्रतिसाद

CD

संतश्रेष्ठ नामदेवांचा ६७५ वा समाधी सोहळ्याला प्रतिसाद
मुरूड, ता. २२ (बातमीदार) : मुरूड येथील शिंपी समाज हॉलमध्ये संतश्रेष्ठ नामदेव महाराजांचा ६७५ वा समाधी सोहळा उत्साहात आणि भक्तिभावात साजरा करण्यात आला. या वेळी प्रसाद कजबजे दांपत्याच्या हस्ते नामदेव महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. नामदेव महिला मंडळातर्फे आयोजित भजन कार्यक्रमात प्रतिभा बागडे, वैशाली लखमदे, राजश्री सद्रे, गीता सुकाळे, सुनीता करंबे आदींनी सहभाग घेतला. गणेश आळी येथील गुरुवार प्रासादिक भजनी मंडळाच्या भजनसेवेने वातावरण भक्तिरसात न्हाले. या कार्यक्रमात सुनील विरकुड, दिलीप जोशी, अरुण बागडे, प्रदीप बागडे, विजय करंबे, सिद्धेश करंबे, आशिष बागडे, सुधाकर पाटील, संतोष लखमदे, सुशांत सतविडकर, मुन्ना बागडे आदींनी सहभाग घेतला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विजय करंबे, सुरेश सद्रे, गौरव हणमंते, प्रदीप बागडे, सिद्धेश लखमदे, राजेंद्र कजबजे, दर्शन काळबेरे, सौरभ नाझरे आदींनी विशेष मेहनत घेतली.
................
एकदरा पुलावर मोकाट गुरांचा ठिय्या; वाहतुकीला अडथळा
मुरूड, ता. २३ (बातमीदार) : मुरूड शहराजवळील एकदरा पुलावर दररोज मोकाट गुरांमुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होत असून वाहनचालक व पादचाऱ्यांची तारांबळ उडत आहे.
विशेषतः सायंकाळी मोठ्या प्रमाणात मोकाट गुरे पुलावर ठिय्या मांडतात, त्यामुळे कोंडी व अपघाताची शक्यता वाढते. काही वेळा शिंगे मारण्याचे प्रकारही घडले आहेत. १९६२ रोजी सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे उभारण्यात आलेल्या या पुलावरून मुरूड, एकदरा, राजपुरी, डोंगरी, तळा, म्हसळा, श्रीवर्धन, रोहा इ. भागाकडे जाणाऱ्या वाहनांची संख्या अधिक आहे. मात्र पुलावर दिवाबत्ती नसल्यामुळे रात्री अंधाराचे साम्राज्य असते. अंधारात गुरांचा धक्का लागून पादचारी जखमी होण्याचे प्रकारही घडले आहेत. पूर्वी नगरपरिषदेच्या माध्यमातून मोकाट गुरे पकडून कोंडवाड्यात ठेवली जात होती. आता मात्र ती व्यवस्था बंद झाल्याने नागरिक त्रस्त आहेत. शासनाने या समस्येकडे गांभीर्याने पाहून तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी नागरिकांची मागणी आहे.
..................
मुरूडमध्ये १०३ बुद्धिबळपटूंची चुरस
मुरूड (बातमीदार) : जय श्रीराम बुद्धिबळ प्रेमी संघटना, जय श्रीराम नागरी पतसंस्था आणि रायगड जिल्हा बुद्धिबळ असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने नांदगाव येथील माळी समाज सभागृहात बुद्धिबळ स्पर्धा उत्साहात पार पडली. या स्पर्धेत जिल्ह्यातील १०३ स्पर्धकांनी सहभाग घेतला. खुल्या गटात अरुणा विजय मयेकर आणि १६ वर्षांखालील गटात नूपूर संजय जमनू यांनी पदक मिळवून मुरूडचा झेंडा उंचावला. यावेळी जय श्रीराम पतसंस्थेचे अध्यक्ष दिलीप जोशी, संचालक सुनील विरकुड, डॉ. संजय पाटील, सरपंच अल्पा घुमकर आदी मान्यवर उपस्थित होते.
स्पर्धेचे संयोजन विलास म्हात्रे व दिलीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. मुरूडमध्ये प्रथमच झालेल्या बुद्धिबळ स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याने आयोजक आनंदित झाले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CP Radhakrishnan देशाचे १५ वे उपराष्ट्रपती, आता सुविधा काय मिळणार? पगाराचा आकडा वाचून व्हाल थक्क

Dewald Brevis: CSK च्या सुपरस्टारला लागली ऐतिहासिक बोली; IPL च्या चारपट मिळणार पैसे

CP Radhakrishnan Vice President of India : सी पी राधाकृष्णन भारताचे नवे उपराष्ट्रपती; इंडिया आघाडीच्या बी. सुदर्शन रेड्डी यांचा पराभव!

Explained: CAD म्हणजे काय? जाणून घ्या हृदयशस्त्रक्रियेबाबतचे ७ मोठे गैरसमज आणि सत्य

Latest Marathi News Live Updates: पणन विभागाचीच माझ्याकडे अर्धी गर्दी - कृषिमंत्री भरणे मामा

SCROLL FOR NEXT