मुंबई

प्राचार्य असल्याचा बनाव; ३४ लाख रुपये उकळले!

CD

प्राचार्य असल्याचा बनाव;
३४ लाख रुपये उकळले!
लिपिकावर गुन्हा दाखल
उल्हासनगर, ता. २४ (वार्ताहर) : उल्हासनगरच्या हिललाइन पोलिस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या नेवाळी येथील ‘ओम साई इंग्लिश स्कूल’ या खासगी प्राथमिक शाळेत लिपिक पदावर कार्यरत असलेल्या मृगमल्ल अण्णामलई या व्यक्तीने स्वतः प्राचार्य असल्याचे भासवून शाळेच्या नावावर तब्बल ३४ लाख ४५ हजार रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याची धक्कादायक घटना उघड झाली आहे.

विद्यार्थ्यांचे शैक्षणिक शुल्क आणि इतर शुल्क पालकांकडून गोळा करताना त्याने हे पैसे शाळेच्या अधिकृत खात्यात न भरता स्वतःच्या खात्यात वळवले. या प्रकारामुळे शाळेचे आर्थिक नुकसान झाले असून, संस्थेचे संचालक प्रवीण अलपुरिया यांनी हिललाइन पोलिस ठाण्यात अण्णामलई याच्याविरोधात तक्रार दाखल केली आहे.

नेवाळी नाका परिसरातील ओम साई इंग्लिश स्कूल याच शाळेत मृगमल्ल अण्णामलई हा लिपिक म्हणून कार्यरत होता. शाळेत भेट देताना तो पालकांना स्वतःची प्राचार्य अशी ओळख सांगून दिशाभूल करीत होता. शुल्क घेण्याच्या प्रक्रियेत शाळेला अधिक कर भरावा लागत असल्याचे सांगून पालकांकडून जास्त रक्कम गोळा केली जात होती. या काळात अण्णामलई याने टप्प्याटप्प्याने मिळालेली रक्कम एकूण ३४ लाख ४५ हजार रुपये स्वतःच्या बँक खात्यात जमा केली. ही रक्कम शाळेच्या अधिकृत खात्यात भरली गेली नसल्याचे संचालकांच्या निदर्शनास आल्यावर त्यांनी आढावा घेतला आणि फसवणुकीचा प्रकार उघडकीस आणला.
संचालक प्रवीण अलपुरिया यांनी यासंदर्भात तत्काळ हिललाइन पोलिस ठाण्यात लेखी तक्रार दिल्यानंतर अण्णामलई याच्याविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

NEET Paper Leak: 'नीट पेपर लीक' प्रकरणात सीबीआयकडून चार्जशीट दाखल; शिवराज मोटेगावकरसह 13 आरोपींचा समावेश

Pune Online Toy Car Scam: टॉय कारच्या ऑनलाइन खरेदीत शिवाजीनगरातील महिलेची पावणेचार लाखांची फसवणूक

Shraddha Chopde: 'ज्युदोच्या मॅट'वर शेतकरी कन्येचा सुवर्ण हुंकार! महाराष्ट्राची कन्या श्रद्धा चोपडे पदक जिंकण्यासाठी ग्लासगोला रवाना

Gang Rivalry Foiled: कृष्णा आंदेकरवरील गोळीबाराचा कट उधळला; नंदुरबारला जाताना पोलिस व्हॅनवर हल्ल्याची होती योजना

Shirur Temple Robbery: शिरूर जैन मंदिर दरोडा प्रकरणी तिघांना २५ महिन्यांचा कठोर कारावास; भाविकांत समाधान

SCROLL FOR NEXT