मुंबई

महामार्गावर चक्का जाम

CD

नालासोपारा, ता. २४ (बातमीदार) : मुंबई-अहमदाबाद महामार्गावर चिंचोटी येथे प्रहार जनशक्ती पक्षाच्या कार्यकर्त्यांनी अचानक रस्त्यावर उतरून रास्ता रोको करत अर्धा तास चक्का जाम केला. गुरुवारी (ता. २४) सकाळी साडेदहा ते ११ वाजेपर्यंत गुजरात मार्गिकेवर हे आंदोलन केले. आंदोलनाचे स्थळ पोलिसांना वेगळेच देत कार्यकर्त्यांनी दुसऱ्याच ठिकाणी अचानक रास्ता रोको आंदोलन केल्याने पोलिसांची एकाच तारांबळ उडाली होती. या आंदोलनामुळे महामार्गावर पाच किमीपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. पोलिसांनी १७ जणांवर नायगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. पक्षाचे जिल्हाध्यक्ष हितेश जाधव यांसह चार जणांना न्यायालयात हजर केले, तर अन्य आंदोलकांना नोटीस देऊन सोडण्यात आले.

शेतकऱ्यांच्या सातबारा कोरा झाला पाहिजे, यासह विविध मागण्यांसाठी प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली राज्यभर चक्का जाम आंदोलन पुकारले होते. त्याच धर्तीवर आज पक्षाच्या कार्यकर्त्यांनी महामार्गावर रास्ता रोको केला. हे आंदोलन महामार्गावरील वसईतील डीमार्टजवळ होणार होते, मात्रा पोलिसांनी बुधवारी (ता. २३) रात्रीच जमावबंदीच्या नोटिसा कार्यकर्त्यांना दिल्या होत्या. पोलिसांना ज्या आंदोलन स्थळाची माहिती देण्यात आली होती, त्या ठिकाणी बंदोबस्तही लावण्यात आला होता, मात्र पोलिस आंदोलन मोडीत काढणार, हे लक्षात आल्याने पक्षाचे जिल्हाध्यक्ष हितेश जाधव यांनी रात्रीच आंदोलनाची दिशा बदलून, पोलिसांना कोणतीही खबर न मिळू देता, चिंचोटी पुलाजवळ अचानक आंदोलन सुरू केले होते.

पोलिसांची तारांबळ
काही वेळात महामार्ग रोखण्यात आला. पोलिसांचा बंदोबस्त ज्या ठिकाणी लागला आणि आंदोलन सुरू असलेले ठिकाण यात पाच किमी अंतर असल्याने पोलिसांची एकच तारांबळ उडाली. चिंचोटी महामार्ग वाहतूक पोलिस निरीक्षक अरविंद चौधरी हे प्रथम घटनास्थळावर पोहोचून आंदोलनकर्त्यांना आवरण्याचा प्रयत्न करीत होते, मात्र आंदोलनात दिव्यांग, मतिमंदांसह प्रहारचे कार्यकर्ते सामील असल्याने आंदोलन उठविणे शक्य झाले नाही. वसई, वालीव, पेल्हार, आचोळा येथील पोलिस अधिकारी फौजफाट्यासह आंदोलनस्थळावर दाखल झाल्यावर कार्यकर्त्यांना ताब्यात घेऊन महामार्ग मोकळा करण्यात यश मिळविले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ZIM: भारतीय संघाचा वर्ल्ड रेकॉर्ड! T20I क्रिकेटमध्ये आजपर्यंत कोणीच न केलेला पराक्रम करून दाखवला

Govinda Insurance: गोविंदांसाठी आनंदाची बातमी! २ लाख गोविंदांना मिळणार विमा संरक्षण; दहीहंडीपूर्वी राज्य सरकारचा मोठा निर्णय

Nanded News: नांदेड जिल्हा बँक निवडणुकीचा आज देगलूरात फैसला; सहकारातील राजकीय चुरस शिगेला

नव्या मुख्य सचिवांच्या नियुक्तीनंतर प्रशासनात मोठा बदल; २० IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या, जाणून घ्या यादी...

Farmer Loan Waiver List : सिंधुदुर्गातील 307 गावांतील शेतकऱ्यांसाठी खूशखबर! 'कर्जमुक्ती'ची पहिली यादी जाहीर; 6,711 शेतकरी पात्र, 53 कोटींहून अधिक निधी अपेक्षित

SCROLL FOR NEXT