मुंबई

अधिकाऱ्यांच्या बढतीवर ‘बेस्ट’ कामगारांचा आक्षेप

CD

अधिकाऱ्यांच्या बढतीवर ‘बेस्ट’ कामगारांचा आक्षेप

सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २४ ः बेस्ट आर्थिक संकटात असताना बेस्टच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना बढतीचे धोरण बेस्ट प्रशासन राबवीत आहे. प्रशासनाच्या या धोरणावर बेस्टमधील कामगार संघटनांनी आक्षेप घेतला आहे. अधिकाऱ्यांना बढती दिली जात असेल तर कामगारांना बढती का दिली जात नाही, असा सवाल कामगार संघटनांनी केली आहे.
बेस्ट उपक्रमात कामगारांना बढती देताना बेस्टच्या आर्थिक तुटवड्याचे कारण दिले जाते; मात्र मुख्य व्यवस्थापक पदावर असलेल्या अधिकाऱ्याच्या सेवानिवृत्तीला १५ दिवस शिल्लक असताना उपमहाव्यवस्थापक पदावर त्यांना बढती देण्यात आली आहे. यावरून सध्या बेस्ट उपक्रमातील कामगार संघटनांकडून आक्रमक पवित्रा घेण्यात आला आहे. कामगारांना बढती देताना आर्थिक कारण पुढे केले जाते; मग अधिकाऱ्यांना कशी काय बढती दिली जाते, असा सवाल कामगार संघटनांनी विचारला आहे.  सेवानिवृत्तीला १५ दिवस शिल्लक असताना दिलेल्या या बढतीमुळे बेस्टच्या तिजोरीवर भार येणार आहे. त्यामुळे बेस्टमधील दोन मोठ्या कामगार संघटनांनी या बढतीला विरोध केला आहे.
...
प्रशासनाचे आश्वासन
कामगारांच्या या विरोधानंतर आता ज्या ठिकाणी शक्य असेल त्या ठिकाणी बढती धोरण राबविले जाईल, असे आश्वासन प्रशासनाने दिल्याचे बेस्ट कामगार सेनेचे अध्यक्ष सुहास सामंत यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ZIM: भारतीय संघाचा वर्ल्ड रेकॉर्ड! T20I क्रिकेटमध्ये आजपर्यंत कोणीच न केलेला पराक्रम करून दाखवला

Govinda Insurance: गोविंदांसाठी आनंदाची बातमी! २ लाख गोविंदांना मिळणार विमा संरक्षण; दहीहंडीपूर्वी राज्य सरकारचा मोठा निर्णय

Nanded News: नांदेड जिल्हा बँक निवडणुकीचा आज देगलूरात फैसला; सहकारातील राजकीय चुरस शिगेला

नव्या मुख्य सचिवांच्या नियुक्तीनंतर प्रशासनात मोठा बदल; २० IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या, जाणून घ्या यादी...

Farmer Loan Waiver List : सिंधुदुर्गातील 307 गावांतील शेतकऱ्यांसाठी खूशखबर! 'कर्जमुक्ती'ची पहिली यादी जाहीर; 6,711 शेतकरी पात्र, 53 कोटींहून अधिक निधी अपेक्षित

SCROLL FOR NEXT