मुंबई

गेल्या वर्षीच्या तुलनेत ४६ टक्क्यांनी रुग्ण वाढले

CD

मॉन्सूनपू्र्व पावसामुळे मलेरियाचा वाढता प्रादुर्भाव
राज्यात आठ हजारांहून अधिक रुग्णांची नोंद
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २५ : मॉन्सूनपूर्व झालेल्या पावसामुळे राज्यात मलेरियाचा प्रादुर्भाव वाढत आहे. राज्याच्या आरोग्य विभागाने यावर्षी मलेरियाच्या रुग्णांमध्ये वाढ नोंदवली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत रुग्णांमध्ये ४६ टक्के वाढ झाली आहे. १४ जुलैपर्यंत राज्यात ८,९८३ रुग्णांची नोंद झाली आहे. गेल्या वर्षी याच काळात ६,१५० रुग्ण आढळले होते. चिकुनगुनियामध्येही गेल्या वर्षीच्या तुलनेत वाढ झाली आहे. गेल्या वर्षी १,१८९ रुग्णसंख्या होती. १४ जुलैपर्यंत १,२१० रुग्ण आढळले, पण डेंगीचे प्रमाण कमी झाले आहे, गेल्या वर्षीच्या ५,७७९ रुग्णांच्या तुलनेत १४ जुलैपर्यंत ३,१९१ रुग्णांची नोंद झाली आहे.
.................
‘यावर्षी आम्हाला मलेरिया आणि डेंगीचे अधिक रुग्ण आढळत आहेत, चिकुनगुनियादेखील वाढला आहे, पण मुंबईत मलेरियाच्या रुग्णांमध्ये वाढ होत आहे. सुमारे ५० टक्के मलेरिया रुग्ण घरी बरे होतात, परंतु काही रुग्ण अ‍ॅक्यूट हेमोलिटिक युरेमिक सिंड्रोम घेऊन येत आहेत, ज्याचा थेट किडनीवर परिणाम होतो.’
- डॉ. मधुकर गायकवाड, जे. जे. रुग्णालय, मेडिसिन युनिटप्रमुख.
.......................................
हंगामी आजार
१४ जुलै २०२५ पर्यंत राज्यातील चिकुनगुनियाच्या रुग्णांची संख्या - १,२१०
मुंबई - १७९
पुणे - १३४
......................................
रुग्णांची संख्या
आजार २०२५ २०२४
मलेरिया ८,९८३ ६,१५०
डेंगी ३,१९१ ५,७७९
...............................
विविध स्रोतांची तपासणी
पालिका आरोग्य अधिकाऱ्यांच्या मते मे महिन्यातच पाऊस सुरू झाल्याने कीटकजन्य आजारांसाठी पोषक वातावरण तयार झाल्याने २०२४ च्या तुलनेत २०२५ मध्ये मलेरिया, डेंगी व चिकुनगुनिया आजारांच्या रुग्णसंख्येच वाढ दिसून येत आहे.

तपासणी केलेल्या प्रजनन स्रोतांची संख्या २२,५८२
आढळलेली ॲनोफिलीस (मलेरियाच्या) डासांच्या उत्पत्तीची संख्या ३,३९३
................................
काय काळजी घ्याल?
ःनागरिकांनी घरामध्ये अथवा घराच्या आजूबाजूला व इमारतींच्या परिसरात कुठेही पाणी साचणार नाही, याची दक्षता घ्यावी.
ः डासांची उत्पत्ती स्थळे तयार होऊ नयेत यासाठी कचऱ्याचा याेग्य निचरा करावा.
ः ताप आल्यास जवळच्या रुग्णालयात संपर्क साधावा.
ः जुने टायर, पाण्याच्या टाक्या, प्लॅस्टिक कंटेनर या वस्तू जमा करणे टाळावे.
ः दिवसा व रात्री झोपताना मच्छरदाणी किंवा डास प्रतिबंधात्मक औषधांचा वापर करावा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

दारू ड्रग्ज हुक्का...! पुण्यातल्या रेव्ह पार्टीत बड्या राजकीय नेत्याचा पती सापडला! २ महिलांसह ५ पुरुषांना घेतलं ताब्यात

Satej Patil : माणसं येतात जातात परंतु माणसं तयार करणारी फॅक्टरी बंटी पाटील हाय..., आमचं ठरलयं नाही आता त्यांचा करेक्ट कार्यक्रमचं

Pune Traffic : गणेशोत्सवाच्या तयारीसोबत खरेदीची गर्दी; पुण्याच्या मध्यवर्ती भागांत वाहतूक कोंडी

MPSC Update : एमपीएससीची ‘ई-केवायसी’ प्रक्रिया सुरू; उमेदवारांना ओळख पडताळणी बंधनकारक, विद्यार्थ्यांकडून स्वागत

Health Tests For Men: पन्नाशीनंतर निरोगी राहण्यासाठी पुरुषांनी कराव्यात 'या' ५ महत्त्वाच्या चाचण्या

SCROLL FOR NEXT