मुंबई

रस्त्यांवरील खोदकामास परवानगी द्यावी

CD

रस्त्यांवरील खोदकामास परवानगी द्यावी
मुंबई, ता. २५ : मुंबईत जुन्या जलवाहिन्या व वीजवाहिन्यांत सातत्याने बिघाड होत असतो. त्यामुळे त्यांच्या दुरुस्तीसाठी वेळेवर परवानगी न मिळाल्याने परिस्थिती आणखी गंभीर हाेऊन नागरिकांना त्याचा त्रास हाेताे. माजी नगरसेवक जावेद जुनेजा यांनी मुंबई महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांच्याकडे निवेदन सादर करून रस्त्यांवरील अत्यावश्यक खोदकामासाठी परवानगी प्रक्रियेत शिथिलता आणण्याची मागणी केली आहे.
जुन्या सुविधांच्या दुरुस्तीकरिता रस्ते खोदण्याची वेळ येते; मात्र महापालिकेच्या परिपत्रकानुसार डीएलपी रस्त्यांवर तीन वर्षे आणि नॉन डीएलपी रस्त्यांवर तीन वर्षांहून अधिक काळ खोदकामास बंदी आहे. या निर्णयामुळे शहरातील अनेक ठिकाणी अडचणी निर्माण झाल्या आहेत. विभागीय अभियंता कार्यालयाकडून खाेदकामाची परवानगी मिळण्यासाठी १५ ते २० दिवस लागतात. त्यामुळे पूर्वीप्रमाणे विभागीय आयुक्तांना खोदकामासाठी परवानगी देण्याचे अधिकार पुन्हा बहाल करून अत्यावश्यक सेवांच्या सुरळीत कार्यवाहीसाठी रस्त्यावर खोदकामांना परवानगी द्यावी, अशी मागणी माजी नगरसेवक जुनेजा यांनी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

दारू ड्रग्ज हुक्का...! पुण्यातल्या रेव्ह पार्टीत बड्या राजकीय नेत्याचा पती सापडला! २ महिलांसह ५ पुरुषांना घेतलं ताब्यात

Satej Patil : माणसं येतात जातात परंतु माणसं तयार करणारी फॅक्टरी बंटी पाटील हाय..., आमचं ठरलयं नाही आता त्यांचा करेक्ट कार्यक्रमचं

Pune Traffic : गणेशोत्सवाच्या तयारीसोबत खरेदीची गर्दी; पुण्याच्या मध्यवर्ती भागांत वाहतूक कोंडी

MPSC Update : एमपीएससीची ‘ई-केवायसी’ प्रक्रिया सुरू; उमेदवारांना ओळख पडताळणी बंधनकारक, विद्यार्थ्यांकडून स्वागत

Health Tests For Men: पन्नाशीनंतर निरोगी राहण्यासाठी पुरुषांनी कराव्यात 'या' ५ महत्त्वाच्या चाचण्या

SCROLL FOR NEXT