मुंबई

आंबेवाडी येथील खड्ड्यांमुळे जीवघेणा प्रवास

CD

आंबेवाडी येथील खड्ड्यांमुळे जीवघेणा प्रवास
महामार्गाच्या कामात संथगती; अपघाताची शक्यता वाढली
रोहा, ता. २६ (वार्ताहर) ः मुंबई-गोवा महामार्गावरील आंबेवाडी (कोलाड) येथील बाजारपेठेत, विशेषतः बँक ऑफ इंडियासमोरील भागात दीड ते दोन फूट खोल खड्डे पडले आहेत. त्यामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होत आहे. वाहनचालकांना या खड्ड्यांमधून मार्ग काढताना जीव मुठीत धरावा लागत असून, अपघाताच्या घटना घडण्याची शक्यता अधिकच वाढली आहे.
दोन दिवसांपूर्वी एक मिनीडोअर वाहन खड्ड्यांमध्ये अडकल्याने पलटी होण्याच्या अवस्थेत होते. सुदैवाने मोठा अपघात टळला. येथे भविष्यात जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे संबंधित प्रशासनाने तातडीने हे खड्डे भरून तात्पुरती का होईना पण उपाययोजना करावी, अशी नागरिकांची मागणी आहे. मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम गेली १८ वर्षे सुरू असून, अद्याप अपूर्ण आहे. एक तप उलटून गेले तरी महामार्गाचा ‘वनवास’ संपलेला नाही. या दिरंगाईमुळे स्थानिक ग्रामस्थ, व्यावसायिक व प्रवासीवर्ग प्रचंड त्रस्त आहेत. महामार्गालगत असलेल्या तळवली, तिसे, वरसगाव, आंबेवाडी, गोवे, पुई, खांब, नागोठणे या गावांमध्ये रस्त्याची स्थिती अतिशय दयनीय झाली आहे. खड्ड्यांमध्ये पाणी साचून चिखल झाला आहे. त्‍यामुळे वाहनचालकांसह पादचाऱ्यांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. राज्य सरकारकडून कोट्यवधी रुपयांचा निधी मंजूर होऊनही रस्त्याचे काम संथगतीने सुरू आहे. या महामार्गासाठी अनेकांनी आपली जमीन, घरे, दुकाने, पोल्ट्री फार्म गमावले आहेत. रोजंदारीवर जगणाऱ्या मजुरांचाही उदरनिर्वाह बुडाला आहे. इतकी किंमत मोजूनही नागरिकांना अपूर्ण रस्त्याची धूळ खात जगावे लागत आहे. सुकेळी ते आंबेवाडी नाका या दरम्यान रस्त्याची अवस्था अधिकच बिकट आहे. अनेक ठिकाणी खड्ड्यांचे साम्राज्य पसरले असून, कोणतीही क्षणी मोठी दुर्घटना घडू शकते.
.................
कोट
आंबेवाडीतील बँक ऑफ इंडियासमोरील रस्‍त्‍यावर अनेक दिवसांपासून खड्डे पडले आहेत. त्‍यामुळे वाहनचालकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. भविष्यात एखादा मोठा अपघात घडल्यास जबाबदार कोण असणार आहे?
- चंद्रकांत लोखंडे, उप तालुकाप्रमुख, शिवसेना (उबाठा)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Playoff Schedule: जेतेपदासाठी लढण्यास टॉप - ४ संघ सज्ज! कधी अन् कुठे रंगणार प्लेऑफचे सामने? नोट करून ठेवा

IPL 2026: मुंबई इंडियन्सविरुद्ध राजस्थानने 'ती' चाल खेळली अन् पंजाब-कोलकाताचा गेम केला; कर्णधार रियान परागचा खुलासा

MI vs RR: वैभव सूर्यवंशीचा वर्ल्ड रेकॉर्ड! मुंबई इंडियन्सविरुद्ध ४ धावांवर आऊट होऊनही घडवलाय इतिहास

IPL 2026 Final Points Table: अजिंक्य रहाणे लढला, पण KKR हरले! दिल्लीने शेवटचा सामना जिंकला अन् CSK ला टाकले मागे

Trump on Iran: अमेरिका-इराण चर्चेत मोठी घडामोड! अण्वस्त्र बनवू देणार नाही, करार होईपर्यंत निर्बंध कायम; ट्रम्प यांचा इशारा

SCROLL FOR NEXT