मुंबई

चित्रबलाक वसईच्या आश्रयस्थानी!

CD

विरार, ता. २६ (बातमीदार) : बहुप्रतीक्षित चित्रबलाक अर्थात पेंटेड स्टॉर्क हा पक्षी अखेर वसईच्या आश्रयस्थानी आल्याने पक्षिप्रेमी व अभ्यासकांकरिता पर्वणी चालून आली आहे. वसई-उमेळा फाटा आणि दत्तानी मॉल परिसरातील हिरव्यागार विस्तीर्ण पाणथळ जागांत सध्या मोठ्या प्रमाणात विसावले असून हे पक्षी सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहेत.

अर्नाळा समुद्रकिनाऱ्याच्या शांत किनाऱ्यापासून विस्तीर्ण पाणथळ जागांतील झुडुपे ते तुंगारेश्वर वन्यजीव अभयारण्याच्या हिरवळीच्या सदाहरित जंगलापर्यंतच्या प्रदेशात विविध प्रकारचे पक्षी व प्रजाती आणि त्यांना आकर्षिक करणाऱ्या विविध परिसंस्था आहेत. यातील किनारपट्टी व पाणथळ जागा स्थलांतरित पक्ष्यांसाठी महत्त्वाचा थांबा म्हणून काम करीत असतात. साहजिकच, उपखंडांमधून प्रवास करणारे अनेक पक्षी तात्पुरत्या स्वरूपात या ठिकाणी आश्रयाला येतात. गोड्या पाण्यातील पाणथळ जागांत सुंदर बगळे ते जकाना आणि समुद्रावरून सुंदर प्रवास करणारे सँडपाइपर, प्लोव्हर, ऑयस्टरकॅचर, गुल आणि टर्न आदी पक्षी नेहमीच या ठिकाणी दृष्टीस पडतात. तुंगारेश्वरच्या हिरवळीच्या जंगलातही असंख्य निवासी आणि स्थलांतरित पक्ष्यांच्या प्रजाती आहेत, त्यामुळे पक्षीप्रेमींसाठी हा मनमोहक अनुभव असतो.

सध्या वसई-उमेळा फाटा आणि दत्तानी मॉल परिसरातील हिरव्यागार विस्तीर्ण पाणथळ जागांत बहुप्रतीक्षित चित्रबलाक अर्थात पेंटेड स्टॉर्क विसावलेले आहेत. चित्रबलाक हा पक्षी प्रामुख्याने भारतीय उपखंड आणि आग्नेय आशियात आढळतो. आकाराने मोठा असलेल्या या पक्ष्याचे पंख पांढरे आणि गुलाबी रंगाचे असतात. त्याची चोच पिवळी आणि पाय लाल असतात. भारतात विशेषतः नद्या, तलाव आणि भातशेती अशा पाणथळ प्रदेशात हा पक्षी आश्रयाला असतो. मासे, बेडूक आणि इतर लहान जलचर प्राणी हा त्याचा आहार आहे. मराठीत चित्रबलाक, रंगीत करकोचा आणि रत्यतंब या नावांनी तो ओळखला जातो. हा पक्षी थव्याने राहतो आणि एकत्र शिकार करतो.

वसईतील पाणथळ जागा या जैवविविधतेला पोषक वातावरण निर्माण करणाऱ्या असल्याने या जागांचे संवर्धन करण्याची गरज आहे. मागील काही वर्षांत वसईतील पाणथळ जागांवर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झालेले आहे. त्याचे परिणाम पक्षी संख्येवर होत आहेत.
- चेतन घरत, पक्षी निरीक्षक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray : उद्धव ठाकरेंना शुभेच्छा देण्यासाठी राज ठाकरे पहिल्यांदाच मातोश्रीवर, महाराष्ट्राच्या राजकारणाचा नवा अध्याय सुरु?

महाराष्ट्राला वेड लावणाऱ्या अर्जुन सुभेदार खऱ्या आयुष्यातील बायकोचा सतत खातो ओरडा, म्हणाते..'किती वाकडं तोंड...'

Video : फूडचं पाऊल ! मराठी अभिनेत्रीची हॉटेल क्षेत्रात एंट्री ; सुबोध भावेच्या हस्ते पार पडलं उद्घाटन

Baramati Accident : बारामतीत भीषण अपघात, हायवाच्या धडकेत वडिलांसह दोन चिमुकल्या मुलींचा मृत्यू

Jalna Crime : मंठा तालुक्यात अनैतिक संबंधाच्या संशयातून अमानुष खून

SCROLL FOR NEXT