मुंबई

घोडबंदर मार्गाला रस्ता म्हणायचे का?

CD

घोडबंदर मार्गाला रस्ता म्हणायचे का?

समाजमाध्यमावर अभिनेत्री रूपाली भोसलेचा संताप

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. २६ : घोडबंदर मार्गावरून पहाटे प्रवास करताना झालेल्या त्रासाबाबत अभिनेत्री रूपाली भोसले हिने समाजमाध्यमावरून संताप व्‍यक्त केला आहे. ‘अर्ध्या तासाच्या प्रवासासाठी दोन तास लागतात. याला रस्ता म्हणायचा काय? काय अवस्था आहे घोडबंदर मार्गाची? बेकार, एकदम बेकार,’ असा त्रागा करून विरार ते ठाणे प्रवासाचा व्हिडिओ प्रसारित केला आहे.

ठाण्यातील घोडबंदर आणि गायमुख घाट हे मार्ग प्रवासासाठी खडतर ठरत आहेत. हायटेकप्रणाली वापरून या मार्गाची डागडुजी केल्याचा दावा पावसाच्या सरींमुळे पडलेल्या खड्ड्यांनी फोल ठरवला आहे. त्यात पहाटे अवजड वाहनांची गर्दी यामुळे विरारहून ठाणे गाठणे दिवसेंदिवस कठीण होत आहे. ही परिस्थिती आजची नाही, तर पाच वर्षांपासून हे सुरू आहे. सर्वसामान्य चाकरमानी या प्रवासाला वैतागले असताना आता सेलिब्रिटींनाही याचा फटका बसू लागला आहे. आतापर्यंत अभिनेत्री ऐश्वर्या नारकर, अभिजित केळकर, अपूर्वा नेमळेकर यांसारख्या कलाकारांनी जाहीर नाराजी व्यक्त केली होती. आता ‘आई कुठे काय करते’ या मालिकेमुळे घराघरात पोहोचलेल्या रूपाली भोसले हिने समाजमाध्यमांवरून संताप व्यक्त केला आहे. चित्रीकरण आटोपून पहाटे ठाण्यात घरी परतत असताना तिला अनुभव आला. रोज १२ ते १४ तासांचे चित्रीकरण आटोपून पहाटे साडेपाच वाजता घरी निघाल्यावर अर्ध्या तासाच्या प्रवासासाठी दोन तास रखडपट्टी होत असल्याचे तिने नाराजी व्‍यक्त केली आहे. या पोस्टवर नेटकऱ्यांनीही आपला संताप व्‍यक्त केला आहे.
---------------
नेटकऱ्यांनीही केले मन मोकळे
- ‘काय करणार आपल्याकडे चांगले राजकारणी नाहीत. सरकारी कर्मचारी, राजकारणी यांना ठेकेदारांनी विकत घेतले आहे. आपण फक्त टॅक्स भरायचा,’ असे प्रशांत भिरूड यांनी म्हटले आहे.
- ‘आपली अशी राजकीय व्यवस्था झाली आहे, की आपण काहीच करू शकत नाही. याविरोधात आवाज उठवणाऱ्यांना पाठिंबाही देऊ शकत नाही,’ अशी खंत अविनाश व्‍यक्त करतात.
- अवकाश तंत्रज्ञानाची खिल्ली उडवून अजित लाड म्हणतात, ‘आपण चंद्रावर गाडी चालवतोय, असा आभास होण्यासाठी असे रस्ते दिले असावेत.’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

विषारी दारूने मृत्यूआधी दृष्टी अधू झाली, तोंडाला फेस आला; आतापर्यंत २१ मृत्यू, २२ अधिकाऱ्यांचे निलंबन

Ebola Virus: इबोला व्हायरसचा उद्रेक! ९०० हून अधिक जणांना संसर्ग, २२३ रुग्णांचा मृत्यू; नवीन स्ट्रेन किती धोकादायक?

Mumbai: ब्रेकऐवजी एक्सिलरेटरवर पाय, कारखाली चिरडून महिलेसह चिमुकल्याचा मृत्यू; मुंबईत भीषण अपघात

Latest Marathi Update Live: कांदा खरेदीत नवा अडथळा, निर्णय झाला तरी अंमलबजावणी रखडली

IPL 2026 : शतक केलं, GT ला फायनलमध्येही नेलं अन् मग शुभमन गिलनं आई-वडिलांना मैदानातच मारली कडकडून मिठी; Video Viral

SCROLL FOR NEXT