मुंबई

दोन सराईत गुन्हेगारांना अटक

CD

तारापूर, ता. २६ (बातमीदार) : बोईसरमधील एका इमारतीच्या बंद घरातून लाखोंच्या दागिन्यांची चोरी करणाऱ्या दोन सराईत गुन्हेगारांना अटक केली आहे. त्यांनी चोरी गेलेले दागिने पुन्हा हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले आहे.

बोईसरच्या नवापूर नाका परिसरातील सिद्धिविनायक सोसायटीत राहणाऱ्या मंजुदेवी दिनेश पुरोहित या शुक्रवारी (ता. ४) आपले घर बंद करून काही कामानिमित्त बाहेर गेल्या होत्या. याचा फायदा घेत चोरट्यांनी त्यांच्या सदनिकेचा दरवाजा तोडून कपाटातील चार लाखांचे सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम चोरून नेली होती. याप्रकरणी पुरोहित यांनी बोईसर पोलिस ठाण्यामध्ये तक्रार दाखल केली होती. या चोरीप्रकरणी कोणतेही धागेदोरे हाती नसताना गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलिस उपनिरीक्षक चंद्रकांत हाके आणि विठ्ठल मनिकेरी यांनी पथक तयार करून घटनास्थळी भेट दिली.

परिसरातील सीसीटीव्ही चित्रीकरण आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे आझादनगर परिसरातून सराईत गुन्हेगार धोनी ऊर्फ पाजी बच्चनसिंग सोडी याला ताब्यात घेऊन त्याची कसून चौकशी केली असता त्याने चोरीचा गुन्हा कबूल केला. चोरी केलेले दागिने नालासोपारा येथील कार्तिक राकेश मारू याच्याकडे विक्रीसाठी दिल्याची कबुली दिली. पोलिसांनी कार्तिक मारू यालादेखील अटक केली आहे. सोडी याच्यावर याआधी पाच, तर कार्तिक याच्यावर एक गुन्हा दाखल आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Playoff Schedule: जेतेपदासाठी लढण्यास टॉप - ४ संघ सज्ज! कधी अन् कुठे रंगणार प्लेऑफचे सामने? नोट करून ठेवा

IPL 2026: मुंबई इंडियन्सविरुद्ध राजस्थानने 'ती' चाल खेळली अन् पंजाब-कोलकाताचा गेम केला; कर्णधार रियान परागचा खुलासा

MI vs RR: वैभव सूर्यवंशीचा वर्ल्ड रेकॉर्ड! मुंबई इंडियन्सविरुद्ध ४ धावांवर आऊट होऊनही घडवलाय इतिहास

IPL 2026 Final Points Table: अजिंक्य रहाणे लढला, पण KKR हरले! दिल्लीने शेवटचा सामना जिंकला अन् CSK ला टाकले मागे

Trump on Iran: अमेरिका-इराण चर्चेत मोठी घडामोड! अण्वस्त्र बनवू देणार नाही, करार होईपर्यंत निर्बंध कायम; ट्रम्प यांचा इशारा

SCROLL FOR NEXT