मुंबई

गुगल मॅपच्या चुकीमुळे बेलापूर खाडीत कोसळली महिला चालकाची कार

CD

गुगल मॅपच्या चुकीमुळे बेलापूर खाडीत
कोसळली महिला चालकाची कार
नवी मुंबई, ता. २६ (वार्ताहर) : गुगल मॅपच्या चुकीच्या मार्गदर्शनामुळे बेलापूर खाडीत एका महिलेची ऑडी कार कोसळल्याची घटना शुक्रवारी (ता. २५) पहाटे घडली. जवळच असलेल्या सागरी सुरक्षा पोलिस आणि इंडियन रेस्क्यू अकॅडमीच्या जवानांनी तत्काळ बचावकार्य राबवत महिलेचे प्राण वाचवले. या घटनेमुळे गुगल मॅपवर संपूर्णपणे अवलंबून राहण्याचे धोके पुन्हा एकदा समोर आले आहेत.
खारघर येथील श्वेता शर्मा (वय २९) मध्यरात्री १ वाजता उलवेकडे जात असताना, गुगल मॅपने त्यांना खाडी पुलाखालचा रस्ता निवडण्याची सूचना केली. अंधारात हा रस्ता थेट ध्रुवतारा जेट्टीवरून खाडीत जात असल्याचे त्यांच्या लक्षात आले नाही आणि त्यांची कार थेट खाडीत कोसळली. प्रसंगावधान राखत श्वेता शर्मा गाडीची डिकी उघडून बाहेर पडल्यामुळे बचावल्या. हा प्रकार त्या ठिकाणी तैनात असलेल्या सागरी सुरक्षा पोलिस चौकीतील जवानांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी तत्काळ गस्ती बोट व रेस्क्यू बोटीद्वारे महिलेचा शोध घेत तिला सुखरूप बाहेर काढले. त्यानंतर क्रेनच्या सहाय्याने खाडीत कोसळलेली कार बाहेर काढण्यात आली.
पोलिसांनी नागरिकांना डिजिटल मार्गदर्शकांवर पूर्णपणे अवलंबून न राहता, विशेषतः अनोळखी परिसरात प्रवास करताना स्थानिक माहितीची खात्री करून अधिक सावधगिरी बाळगण्याचे आवाहन केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold News: सोनं महागलं, आता ड्युटीचाही भार! सरकारच्या 'या' एका निर्णयाने सोन्याची चमक फिकी; खरेदीत तब्बल ७०% घट

Cotton Import Duty Waiver : कापूस आयातीवरील 11 टक्के सीमा शुल्क पूर्णपणे माफ; केंद्र शासनाकडून अधिसूचना जारी, वस्त्रोद्योगाला मोठा दिलासा

Raigad Infrastructure Upgrade: पालीकरांचे स्वप्न साकार; पाली-सुधागड एसटी बसस्थानक पुनर्विकासासाठी १४ कोटींची मंजुरी, तीन महिन्यांत भूमिपूजन

Nasrapur Crime : नसरापूर अत्याचार-खून प्रकरणात सुनावणीला वेग; आरोपीचा शोध घेणाऱ्या दोन महत्त्वाच्या साक्षीदारांची साक्ष नोंद

IMD Alert : जून-जुलैमध्येही उष्णतेची लाट कायम राहणार; माॅन्सून श्रीलंकेवरच रेंगाळला, 7 दिवसांत केरळमध्ये पोहोचण्याची शक्यता, आयएमडीचा नवा अंदाज काय?

SCROLL FOR NEXT