मुंबई

विनयभंगाचा खटला मागे घेण्यासाठी बनाव

CD

अंबरनाथ, ता. २६ (वार्ताहर) : दोन वर्षांपूर्वी दाखल झालेली विनयभंगाची केस मागे घ्यावी, यासाठी अंबरनाथमधील एका आरोपीने चक्क स्वतःवर हल्ला झाल्याचा बनाव रचल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पोलिसांनी तत्काळ तपास करून हा बनाव उघडकीस आणला असून पाच आरोपींना अटक केली आहे. तर प्रमुख आरोपीला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
आकाश अमरजीत गुप्ता (२६) याच्यावर दोन वर्षांपूर्वी विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला होता. हे प्रकरण अद्याप न्यायप्रविष्ट आहे. खटला मागे घेण्यासाठी आकाशने मित्रांच्या मदतीने २४ जुलैला महिंद्रनगर, जावसाई येथे कट रचला. त्याने अजित चव्हाण (२६) या मित्रावर चाकू हल्ला करून स्वतःवरही हल्ला झाल्याचा बनाव केला. या प्रकारात चव्हाण जखमी झाल्याने त्याला उल्हासनगरच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले, तर आकाशवरही उपचार सुरू केले. हल्ला फिर्यादीच्या वडिलांनी आणि भावाने केल्याचा खोटा आरोप करत त्यांच्याविरोधातही गुन्हा दाखल केला. मात्र, वरिष्ठ पोलिस निरीक्षक शब्बीर सय्यद यांना घडलेल्या घटनाक्रमावर संशय आल्याने तपास सुरू केला. सीसीटीव्ही फुटेजमधून आकाश आणि त्याचा मित्र घटनास्थळी असल्याचे स्पष्ट झाल्याने पोलिसांनी आरोपींकडे चौकशी केली. त्या वेळी त्यांनी बनावाची कबुली दिली.
याप्रकरणी आकाश गुप्ता, कन्हैया गुप्ता, सिद्धार्थ गायकवाड, आदित्य जैस्वार आणि मोनू कश्यप या पाच जणांना अटक केली असून, त्यांना दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. मुख्य आरोपी अजितवर सध्या उपचार सुरू आहेत. खोटे गुन्हे दाखल करून पोलिसांची दिशाभूल करणे गंभीर आहे, असा इशारा पोलिस निरीक्षक सय्यद यांनी दिला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Airport Threat : पुणे विमानतळावर हाय अलर्ट! गुवाहटीला जाणाऱ्या विमानात आढळली धक्कादायक चिठ्ठी, प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण, तपास सुरू

Marathi literature decade review : ‘दशकातले लेखक’; २०१०-२०२० मधील मराठी साहित्यप्रवाहाचा सखोल वेध

Manoj Jarange Patil : मनोज जरांगेंनी उपोषण सोडल्यानंतर पहिल्यांदाच दिली प्रतिक्रिया; माझ्या घातपाताचा प्रयत्न कुणी केला?

Prize Money: IPL 2026 चा विजेता होणार मालामाल! चॅम्पियन संघाला मिळणार 'इतके' कोटी रुपये, तर उपविजेत संघालाही मिळणार 'इतके' कोटी

Mumbai Goa Highway Accident: ट्रकवर मोटार आदळून अहिल्यानगरच्या माय-लेकी ठार; मुंबई-गोवा महामार्गावर पोलादपूरजवळ अपघात, बाप-लेक जखमी

SCROLL FOR NEXT