मुंबई

हद्दपार आरोपीला हत्यारासहित जेरबंद !

CD

तडीपार आरोपीला हत्यारासहित जेरबंद
अंबरनाथ, ता. २६ (वार्ताहर) : अंबरनाथमध्ये घरफोडी आणि चोरी करणाऱ्या साहिल विनोद पाटील (वय २४) या तडीपार आरोपीला उल्हासनगर गुन्हे शाखेने हत्यारासहित जेरबंद केले.
उल्हासनगरच्या गायकवाड पाडा परिसरातील साहिल हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याला दोन वर्षासाठी ठाणे जिल्हासह, मुंबई शहर, उपनगर, तसेच रायगड जिल्ह्यातील कर्जत व पनवेल तालुक्यातून दोन वर्षासाठी तडीपार करण्यात आल्याचे आदेश असतानाही, तो अंबरनाथ येथील शिवगंगानगर परिसरात शुक्रवारी (ता. २५) हत्यारासहित येणार असल्याची माहिती उल्हासनगर गुन्हे शाखेचे पोलीस हवालदार राजेंद्र रघुनाथ थोरवे यांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून साहिल पाटील याला पकडले असता त्याच्याजवळ धारदार चाकू सापडला. त्याने यापूर्वीही चाकूचा धाक दाखवत चोरी, घरफोडी केल्या होत्या. या अनुषंगाने ही कारवाई उल्हासनगर गुन्हे शाखा घटक ४ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक योगेश आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली असून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Goa Highway: 'मुंबई-गोवा'वर कोंडी; मे महिना संपत आला पण कामं अपूर्णच

Free Education: JEE-NEET साठी आता मोफत कोचिंग! घरबसल्या IIT प्रोफेसर्सकडून फ्रीमध्ये शिका; जाणून घ्या कुठे?

'मृणालने अमेरिकेत बाळाचा एकटीनं सांभाळ केला' काव्याने सांगितला नंदिनीच्या खऱ्या आयुष्यातील गरोदरपणातील अनुभव, म्हणाली...

Interfaith Blood Donation: बकरी ईद निमित्त मशिदीत सर्वधर्मीयांचे रक्तदान; ‘मानवता हाच खरा धर्म’चा संदेश

Latest Marathi News Live Update : इंदापूर तालुक्यातील प्रश्न पेटला, कृषिमंत्री निघून गेल्यानंतरही शेतकऱ्यांचे आंदोलन सुरूच

SCROLL FOR NEXT