मुंबई

तर आपण भिवंडीच्या विद्यमान खासदारांचा नागरी सत्कार करू - माजी केंद्रीय मंत्री कपिल पाटील

CD

...तर भिवंडीच्या खासदारांचा नागरी सत्कार करणार
माजी केंद्रीय मंत्री कपिल पाटील ः जिजामाता यांचे नाव वापरून संस्थेद्वारे होणाऱ्या गैरकारभाराची शासनाने चौकशी करावी
सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली, ता. २६ ः मागील दहा वर्षांत भिवंडी लोकसभा क्षेत्रात हजारो कोटी रुपयांची विकासकामे केली आहेत. विद्यमान खासदारांनी इतकी विकासकामे केली असतील तर ती दाखवून द्यावी, आपण त्यांचा जाहीर नागरी सत्कार करू, अशा शब्दांत माजी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांनी खासदार सुरेश म्हात्रे यांनी केलेल्या दाव्याची खिल्ली उडवली.
दहा वर्षांच्या कार्यकाळात झालेल्या विकासकामांची माहिती देण्यासाठी आयोजिलेल्या एका कार्यक्रमात ते बोलत होते. एखादी व्यक्ती खरोखर विकास करीत असेल तर ती कोणत्या पक्षाची आहे, हे महत्त्वाचे नाही. जनतेच्या हिताचे काम जर कोणी खरेच करीत असेल आणि ती कामे त्यांनी आपल्याला दाखवली तर त्याबाबत कोणताही आकस असू नये. गेल्या दहा वर्षांत कमीत कमी २८ ते २९ हजार कोटींची विकासकामे मंजूर केली असून ही सर्व कामे सुरू असल्याचे आपल्याला दिसून येईल आणि ते म्हणत आहेत तर आपणही त्यांना विचारले पाहिजे, की तुम्ही केलेली दोन-चार कामे तरी दाखवा, असे सांगत कपिल पाटील यांनी नाव न घेता म्हात्रे यांच्यावर टीका केली.

तत्कालीन आघाडी सरकारमुळे रखडली कल्याण मेट्रो
भिवंडी आणि कल्याण या दोन्हींकडील बदललेल्या डीपीआरला मान्यता देण्याकडे आघाडी सरकारने साफ दुर्लक्ष केल्यानेच कल्याण मेट्रो रखडल्याचा आरोप त्यांनी या वेळी केला; मात्र विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकतेच दोन्ही डीपीआर मंजूर केले असून आता लवकरच या कल्याण मेट्रोच्या कामाला सुरुवात होईल, असा विश्वासही त्यांनी या वेळी व्यक्त केला.

जिजामातांचे नाव वापरून भ्रष्टाचार करणाऱ्या संस्थेची चौकशी व्हावी
एखादी ठेकेदार संस्था जिजामातांचे नाव वापरून भ्रष्टाचार, बोगस काम करीत असतील तर त्यांना हे नाव वापरू न देण्यासाठी राज्य सरकारने कार्यवाही केली पाहिजे, असे सांगत कपिल पाटील यांनी जिजाऊ संघटना आणि या संस्थेचे प्रमुख नीलेश सांबरे यांच्या कारभारावर नाव न घेता ताशेरे ओढले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bank Holiday: जूनमध्ये तब्बल 13 दिवस बँकांना सुट्टी! महाराष्ट्रात किती दिवस बंद राहणार बँका? RBI ची यादी पाहा

Pune : राज्य उत्पादन शुल्क कार्यालय की दारूचा अड्डा? छतावर दारूच्या बाटल्या, VIDEO VIRAL

Bhayandar: मुंबईत मराठी माणसाला घर देण्यास नकार, महिलेचा आरोप; प्रताप सरनाईकांचा संताप

Crime: कर्जत-खोपोली मार्गावर अज्ञात महिलेचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळला; हत्या की घातपात?

पेपरफुटी प्रकरणात मोठी घडामोड; मनिषा हवालदार यांच्या हस्ताक्षर-स्वाक्षरीची फॉरेन्सिक तपासणी होणार

SCROLL FOR NEXT