मुंबई

पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती

CD

ज्ञान विकास विद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे सुयश
नवी मुंबई ः २०२४-२५ या शैक्षणिक वर्षात झालेल्या पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत कोपरखैरणे येथील ज्ञान विकास प्राथमिक विद्यालयाचे एकूण २० विद्यार्थी ठाणे जिल्हा गुणवत्ता यादीत झळकले आहेत. हे यश अत्यंत उल्लेखनीय मानले जात असून, संपूर्ण शाळेसाठी आणि पालकांसाठी अभिमानास्पद ठरले आहे. या गुणवंत विद्यार्थ्यांची नावे पुढीलप्रमाणे आहेत, श्रेयश शिंदे, आराध्या सावंत, वैष्णवी डपळ, श्लोक शेलार, ईश्वरी संकपाळ, रोहित शिंदे, अनुष्का आंधळे, प्रीतम जाधव, समर्थ कदम, प्रांजल घागरे, रुद्र देशमुख, शुभ्रा चौधरी, आरव घराळ, नीती कांबळे, आयुष वाशिवले, ईश्वरी वेंदे, प्रेम कदम, वैष्णवी जाधव, सर्वेश साळुंखे, श्रेयश साळुंखे अशी आहेत. या सर्व विद्यार्थ्यांचे कौतुक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष अ‍ॅड. पी. सी. पाटील, अध्यक्ष प्रसाद पाटील, उपाध्यक्ष राम पाटील, सचिव चंद्रकांत पाटील, खजिनदार विद्यानंद पाटील तसेच प्रशासकीय अधिकारी बिडवे आणि मुख्याध्यापक जगन्नाथ दळवी यांनी केले आहे. या विद्यार्थ्यांना शिक्षक संध्या वेटा, जयश्री बागडे, प्रदीप म्हात्रे व बोडके यांचे उत्कृष्ट मार्गदर्शन लाभले. विद्यार्थ्यांचा सातत्यपूर्ण अभ्यास, नियोजनबद्ध तयारी, सराव, शिक्षकांचे सहकार्य व पालकांचा पाठिंबा यामुळे हे यश शक्य झाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

TCS Recruitment: टीसीएसने कर्मचारी कपातीनंतर आता वेतनवाढ अन् भरतीही थांबवली; IT क्षेत्राचं भविष्य अंधारात?

Operation Sindoor: ऑपरेशन सिंदूर माध्यमांमध्ये केलेला तमाशा, प्रणिती शिंदेंची लोकसभेत टीका, सरकारला प्रश्नांनी घेरले

ऑपरेशन सिंदूरच्या चर्चेत दिग्गजांना डावललं, काँग्रेसमध्ये अंतर्गत धुसफूस; माजी केंद्रीय मंत्र्याने म्हटलं, भारतात राहतो...

AI Fake Verdicts : तरुण वकिलांकडून AI निर्मित बनावट निकाल सादर; सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांचा इशारा

Gold producing bacteria : माती खाऊन बाहेर टाकतो २४ कॅरेट सोनं..! शास्त्रज्ञांना सापडला 'हा' अद्भुत बॅक्टेरिया

SCROLL FOR NEXT