मुंबई

मालमत्ताकरांची कोटीची उड्डाणे

CD

वाशी, ता. २९ (बातमीदार)ः नवी मुंबई पालिकेच्या मालमत्ता कर विभागाने जुलैमध्ये ४४ कोटींचा मालमत्ता कर हा वसूल केला होता. त्यामुळे महिनाअखेरीस ४११.६७ कोटींचा मालमत्ता कर वसूल केला आहे.
आर्थिक वर्षामध्ये कर संकलन वाढीसाठी महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त डॉ. राहुल गेठे यांनी विविध उपक्रम राबवले आहेत. त्यानुसार २०२५-२६ वर्षाकरिता ३० जूनपर्यंत कर भरणाऱ्यांना सामान्य करांमध्ये १० टक्के सवलत देण्यात आली होती. त्यामुळे पालिकेच्या तिजोरीत मालमत्ता जूनअखेर ३६७ कोटींचा कर संकलित करण्यात आला होता. याशिवाय पालिकेने प्रथमच बचत गटांच्या महिलांद्वारे देयकांचे घरपोच वाटप, मोबाईल अ‍ॅप्लिकेशनच्या सहाय्याने मालमत्ताधारकांच्या माहितीचे संकलन व अद्ययावतीकरण, मालमत्ता कर भरण्यासाठी डिजिटल पद्धतीचा स्वीकार, मालमत्ता कराबाबत शंकांचे निरसन, व्हॉट्सॲप चॅटबॉट आणि मालमत्ता करावर १० टक्क्यांची सवलत योजना राबवल्याने करदात्यांना कर भरणे सोईस्कर झाले आहे.
------------------------------------
साडेतीन लाख करदाते
नवी मुंबई पालिका क्षेत्रात तब्बल साडेतीन लाखांहून अधिक करदाते आहेत. शहरातील मालमत्ताधारकांना तिमाहीमध्ये घरपोच देयके मिळाल्याने तसेच मालमत्ता कर भरण्यासाठी डिजिटल पद्धतीला पसंती दिल्याने कर संकलनाला गती मिळाली आहे.
-------------------------------
ऑनलाइनला पसंती
नवी मुंबई महापालिका क्षेत्रातील ८३ हजार ८६३ करदात्यांनी ऑनलाइन रक्कम भरली असून, २४५ कोटींचा महसूल प्राप्त झाला आहे, तर ५० हजार ४०५ करदात्यांनी ऑफलाइन रक्कम भरली असून, त्यामधून १६२ कोटींचा महसूल प्राप्त झाला आहे.
-------------------------------------
करवसुली
विभाग रक्कम कोटीमध्ये
ऐरोली ४७.८१
बेलापूर ३३.५५
दिघा १७.१४
घणसोली ६७.२०
कोपरखैरणे ७३.९४
नेरूळ ८०.२१
तुर्भे ५३.८४
वाशी ३७.९४
एकूण ४११.६६

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Georai News : गेवराईच्या नदीकाठावरील त्या पूरग्रस्तांना चिखलातच दसरा साजरा करण्याची आली वेळ; चिखलाच्या खचाने साफसफाई करण्यासाठी कमी पडला अवधी

Thane News: खबरदार! टिळा आणि बांगड्या घालून याल तर...; खासगी शाळेचा विद्यार्थ्यांसाठी अजब फतवा

Latest Marathi News Live Update : दर वाढीमुळे ग्राहकांची सराफा बाजाराकडे पाठ

US Dollars to INR : जर अमेरिकेतून तुम्ही एक लाख डॉलर आणले, तर भारतात तुमच्या खात्यात एकूण रक्कम...!

Dussehra Melava 2025 Live Update: ठाकरेंच्या मेळाव्याला शिवसैनिकांची गर्दी

SCROLL FOR NEXT