मुंबई

पाताळगंगा नदीप्रती खोपोलीकरांची कृतज्ञता

CD

पाताळगंगा नदीप्रती खोपोलीकरांची कृतज्ञता
श्रावणी हळदी-कुंकूच्या आगळावेगळ्या उपक्रमाला प्रतिसाद
खोपोली, ता. २९ (बातमीदार) : खोपोली शहरातून वाहणाऱ्या पाताळगंगा नदीप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आणि नदी प्रदूषणविरोधी जनजागृती करण्याच्या उद्देशाने सहज सेवा फाउंडेशनतर्फे नदीपूजन आणि महाआरती उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावर्षी या उपक्रमाला श्रावण महिन्याचे औचित्य साधत महिलांसाठी हळदी-कुंकू कार्यक्रमाची जोड देण्यात आली. गगनगिरी आश्रम, खोपोली येथे पार पडलेल्या या अनोख्या उपक्रमास खूप मोठा प्रतिसाद मिळाला.
कार्यक्रमात महिलांसाठी विविध खेळ व स्पर्धा आयोजित करून आकर्षक बक्षिसे देण्यात आली. याशिवाय पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत सीड बॉल आणि कापडी पिशवी वाण स्वरूपात महिलांना भेट देण्यात आली. या उपक्रमाला आनंद शाळा खोपोली, गगनगिरी महाराज आश्रम, आर. टी. झवेरी ज्वेलर्स व सद्गुरू ग्राफिक्स यांचे विशेष सहकार्य लाभले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी सहज सेवा फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. शेखर जांभळे, कार्याध्यक्षा माधुरी गुजराथी, महिला अध्यक्षा नीलम पाटील आणि रंजन चौधरी यांचे विशेष योगदान लाभले. सहज सेवा फाउंडेशनच्या महिला विभागातर्फे हाती घेतलेला हा उपक्रम समाजातील महिला सक्षमीकरणासाठी एक प्रेरणादायी दिशा देणारा ठरत आहे. महिलांसाठी सामाजिक, सांस्कृतिक व पर्यावरणपूरक उपक्रमांचे नियोजन हे स्तुत्य असून, यामुळे खऱ्या अर्थाने ‘सेवा हीच पूजा या तत्त्वाची प्रचीती मिळते’, असे माजी नगरसेविका जिनी सॅम्युअल यांनी गौरवोद्गार काढले.
.............
महिलांचा सन्मान
महिलांचा वाढदिवस सामूहिकपणे साजरा करण्यासाठी आणखी एक उपक्रम जाहीर करण्यात आला. ऑगस्ट २०२५ पासून खोपोली नगर परिषद क्षेत्रातील महिलांचा वाढदिवस दर महिन्याच्या चौथ्या शनिवारी नदीपूजनाच्या वेळी साजरा केला जाणार आहे. त्या दिवशी लकी ड्रॉ काढण्यात येणार असून, त्यासाठी संबंधित महिलांनी वाढदिवसाची माहिती असलेला फॉर्म भरून देणे आवश्यक आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मुलासह कुटुंब संपवेन! व्हिडीओ कॉलवर कपडे काढायला लावले; ४३ वर्षीय महिलेचा VIDEO केला व्हायरल; २३ ते २८ वर्षांच्या तिघांना अटक

Pune Crime : कारागृहातूनही आंदेकर टोळी सक्रिय; पुणे पोलिस आयुक्तांचे कारागृह प्रशासनाला कडक निर्बंधांचे पत्र

America-Pakistan Relations: 'शांतिदूत' बनलेल्या पाकिस्तानला अमेरिकेचा दणका; ट्रम्प यांचा 'तो' प्रस्ताव ऐकून शहबाज यांना शब्द फुटेना

NEET paper leak: मनीषा हवालदार 'एनटीए'मध्ये अनुवादक म्हणून होती कार्यरत; पेपर कसा फोडला? तपासात झालं उघड

Panshet Tragedy: पानशेत धरणात कोंढव्यातील २२ वर्षीय तरुणाचा बुडून मृत्यू; मित्रांसमोर घडली दुर्दैवी घटना

SCROLL FOR NEXT