मुंबई

वाडिया रुग्णालयाने प्रत्येकी १.५ कोटी रुपयांची औषधं पूर्णपणे मोफत उपलब्ध दिली

CD

सिस्टिक फायब्रोसिसच्या ४० बालरुग्णांना औषधोपचार
वाडिया रुग्णालयाकडून प्रत्येकी दीड कोटींची औषधे मोफत
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. २९ : परळच्या वाडिया रुग्णालयाने ४० मुलांना प्रत्येकी दीड कोटी रुपयांची सिस्टिक फायब्रोसिसची औषधे मोफत उपलब्ध करून देण्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे रुग्णांच्या कुटुंबांवरील आर्थिक भार कमी करीत दीर्घकालीन आजारावर आवश्यक उपचार करता येणार आहेत.
सिस्टिक फायब्रोसिस (सीएफ) हा एक आनुवंशिक विकार असून, त्यात प्रामुख्याने फुप्फुसे, स्वादुपिंड आणि इतर अवयवांवर परिणाम होतो. त्यामुळे पचनक्रिया तसेच श्वास घेण्यात अडचणी निर्माण होते. लहान मुलांमध्ये जुनाट खोकला, वारंवार होणारा छातीचा संसर्ग, वजन वाढण्यास अडचणी तसेच वाढ खुंटणे ही या आजाराची प्रमुख लक्षणे आहेत. वेळीच निदान न झाल्यास, फुप्फुसांचे प्रचंड नुकसान होऊन गुंतागुंतीची परिस्थिती निर्माण होते, अशी माहिती वाडिया रुग्णालयाच्या पल्मोनोलॉजी विभागाचे प्रमुख डॉ. परमार्थ चांदने यांनी दिली.
----
गमावलेली आशा पल्लवित
आमचा मुलगा मागील १४ वर्षांपासून फुप्फुसांच्या संसर्गाने त्रस्त होता. आर्थिक अडचणी आणि मर्यादित साधनांमुळे तो बरा होण्याची आम्ही आशा सोडली होती; परंतु आता मोफत उपचारांमुळे आमचा मुलगा मोकळा श्वास घेऊ शकत आहे. त्यामुळे त्याच्या जगण्याच्या आशा पल्लवित झाल्याची प्रतिक्रिया मुरबाड येथील रुग्णाची आई तनुजा खरे यांनी दिली.
----
अडचणी कमी करण्याचा प्रयत्न
दरवर्षी असंख्य मुले सिस्टिक फायब्रोसिस आजाराशी झुंज देतात. त्यांना दीर्घकालीन आणि महागडे उपचार परवडत नाहीत. महागड्या आणि आवश्यक औषधांचा मोफत पुरवठा करून, आम्ही रुग्णांच्या कुटुंबीयांच्या आर्थिक अडचणी कमी करण्याचा प्रयत्न करीत असल्याची माहिती बाई जेरबाई वाडिया रुग्णालयाचे सीईओ डॉ. मिनी बोधनवाला यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Liquor Tragedy : धक्कादायक उलगडा! गावठी दारूचा एकच घोट कसा ठरतो मृत्यूचं कारण? आतली भयावह प्रक्रिया वाचा

Mukesh Ambani: 1 रुपयाही पगार नाही, तरी देशातील दुसरे सर्वात श्रीमंत व्यक्ती! मुकेश अंबानींची कमाई नेमकी कशी होते?

RCB विरुद्ध घरच्या मैदानात फायनल! गुजरातचा प्लॅन काय, कसा खेळणार संघ? शुभमन गिलने केला खुलासा

मी सगळं सोडूनच गेलेलं... लग्नानंतर अभिनय करणार नव्हती मृणाल दुसानिस; बाळ झाल्यानंतर का बदलला निर्णय?

Latest Marathi Update Live: कांदा खरेदीत नवा अडथळा, निर्णय झाला तरी अंमलबजावणी रखडली

SCROLL FOR NEXT