मुंबई

पोगावात होणार अद्यावत अग्निशामक केंद्र

CD

पोगावात होणार अद्यावत अग्निशामक केंद्र
भिवंडी, ता. २९ (बातमीदार) : भिवंडी शहर आणि परिसरात विविध ठिकाणी लागणाऱ्या आगीच्या घटना, त्यामुळे उद्भवणारी परिस्थिती, अचानक घडलेल्या अपघाती घटनांमुळे नागरिकांच्या जीवाला, तसेच मालमत्तेला धोका होऊ नये यासाठी अद्यावत सुसज्ज अग्निशामक दलाचे केंद्र करण्याच्या हालचाली ठाणे नियोजन समितीच्या वतीने सुरू झाल्या आहेत. याबाबत भिवंडी महापालिकेकडून प्रस्ताव मागविण्यात आला आहे.

औद्योगिक आणि रहिवासी संकुलात तत्काळ सेवा देण्यासाठी भिवंडीला अद्ययावत अग्निशामक दलाची नितांत गरज होती. यासाठी शिंदे गटाचे शिवसेना शहर जिल्हाप्रमुख सुभाष माने यांनी मुख्यमंत्र्यांना लेखी पत्र पाठवून अद्ययावत व सुसज्ज अग्निशामक दलाची आवश्यकता नमूद करीत निधीची मागणी केली. हा विषय ठाणे जिल्हा नियोजन समितीकडे आला असून, समितीमार्फत लेखी पत्राद्वारे महापालिकेस विचारणा केली आहे. त्या पत्रानुसार महापालिकेच्या कार्यक्षेत्रातील पोगाव परिसरात आरक्षित जागेवर अग्निशामक केंद्र बांधण्यासाठी पाच कोटी खर्च येणार आहे, तर शहरातील नवीन अग्निशामक केंद्र बांधण्यासाठी तीन कोटी खर्च येणार आहे. या प्रस्तावित कामाच्या अनुषंगाने प्रत्यक्ष स्थळाची पाहणी करून अर्थसंकल्पीय तरतूद आणि सदर कामांसाठी पालिकेकडे असलेली तरतूद तसेच इतर संबंधित विषयांची माहितीचा प्रस्ताव पाठविण्यास सांगितले आहे. त्यामुळे भिवंडीसाठी नव्याने अद्ययावत अग्निशामक केंद्र लवकर बनविण्याच्या हालचालींना वेग आल्याचे प्रशासकीय पातळीवरून सांगितले जाते.

भिवंडी महानगरपालिका आणि ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात विकासकामे सुरू असल्याने अद्ययावत अग्निशामक केंद्राची आवश्यकता आहे. पोगाव येथे महापालिकेची आरक्षित जागा असून, तेथे अग्निशामक केंद्र बनल्यास गोदाम भागातील घटनास्थळी जलद जाणे शक्य होणार आहे, तर भिवंडीतील मुख्य लोकवस्तीत ठाणगे आळीतील अग्निशामक दलाचे जुने कार्यालय आणि केंद्र याची जुनी वास्तू तोडण्याचे काम सुरू आहे. तेथे नवीन केंद्र उभारता येणे शक्य आहे. यासाठी प्रस्ताव या आठवड्यात पाठविणार आहे.
- सचिन नाईक, अतिरिक्त शहर अभियंता, भिवंडी महापालिका

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Airport Threat : पुणे विमानतळावर हाय अलर्ट! गुवाहटीला जाणाऱ्या विमानात आढळली धक्कादायक चिठ्ठी, प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण, तपास सुरू

Marathi literature decade review : ‘दशकातले लेखक’; २०१०-२०२० मधील मराठी साहित्यप्रवाहाचा सखोल वेध

Manoj Jarange Patil : मनोज जरांगेंनी उपोषण सोडल्यानंतर पहिल्यांदाच दिली प्रतिक्रिया; माझ्या घातपाताचा प्रयत्न कुणी केला?

Prize Money: IPL 2026 चा विजेता होणार मालामाल! चॅम्पियन संघाला मिळणार 'इतके' कोटी रुपये, तर उपविजेत संघालाही मिळणार 'इतके' कोटी

Mumbai Goa Highway Accident: ट्रकवर मोटार आदळून अहिल्यानगरच्या माय-लेकी ठार; मुंबई-गोवा महामार्गावर पोलादपूरजवळ अपघात, बाप-लेक जखमी

SCROLL FOR NEXT