मुंबई

...तर यंत्रणेवर मनुष्यवधाचा गुन्हा

CD

...तर यंत्रणेवर मनुष्यवधाचा गुन्हा
जिल्हाधिकारी किशन जावळे यांचा इशारा

अलिबाग, ता. २९ (वार्ताहर) : ‘रस्ते अपघात टाळण्यासाठी सर्व संबंधित यंत्रणा, सार्वजनिक बांधकाम विभाग, राष्ट्रीय महामार्ग तसेच परिवहन विभाग यांनी तातडीने आवश्यक त्या सर्व उपाययोजना कराव्यात, भविष्यातील अपघात टाळण्याच्या दृष्टीने नियोजन करावे, यापुढे या सर्व मार्गांवर रस्ते दुरुस्तीअभावी अपघात घडल्यास संबंधित यंत्रणेवर जबाबदारी निश्चित करण्यात येऊन सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात येईल,’ असा इशारा जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी दिला आहे.

जिल्हाधिकारी कार्यालयात मंगळवारी (ता. २९) आयोजित जिल्हास्तरीय रस्ता सुरक्षा समितीच्या बैठकीत जिल्हाधिकारी जावळे बोलत होते. या वेळी पोलिस अधीक्षक आंचल दलाल, निवासी उपजिल्हाधिकारी संदेश शिर्के, अधीक्षक अभियंता सुषमा गायकवाड, पोलिस उपायुक्त तिरुपती काकडे यांच्यासह सर्व कार्यन्वयीन यंत्रणा उपस्थित होते. या वेळी रायगड ग्रामीण पोलिस तसेच नवी मुंबई पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीत गेल्या वर्षात झालेल्या अपघातांचा व त्या अनुषंगाने केलेल्या उपाययोजनांचा आढावा घेण्यात आला. तसेच सार्वजनिक बांधकाम विभाग, एनएचएआय, एमएसआरडीसी, सार्वजनिक बांधकाम-राष्ट्रीय महामार्ग विभाग, पनवेल महापालिका हद्दीतील धोकादायक अपघात ठिकाणांबाबतचा (ब्लॅकस्पॉट) आढावा घेऊन केलेल्या उपाययोजना व त्यानंतर अपघात प्रमाणात झालेली घट याबाबत चर्चा करण्यात आली.

जिल्ह्यातील रस्ते अपघाताचे प्रमाण कमी करण्यासाठी जिल्ह्यात महामार्ग, राज्यमार्गांवरील ‘ब्लॅक स्पॉट’ शोधून त्यावर उपाययोजना, दर्शक सूचना फलक लावणे, वेग मर्यादा दर्शक फलक लावणे, जिल्ह्यातील रस्ते अपघाताचे प्रमाण शून्यावर आणणे, अपघातानंतर जखमींना तत्काळ उपचार सुविधा उपलब्ध करून मृत्यूदर शून्यावर आणणे यासाठी गांभीर्याने काम करावे, असे निर्देशही जिल्हाधिकाऱ्यांनी दिले.


दुभाजक तोडल्यास कारवाई
काही व्यावसायिक मुख्य मार्गिका आणि सेवारस्ता यामधील दुभाजक तोडत असल्याचे निदर्शनास आले आहे. सेवारस्त्यावरील वाहन अचानक थेट मुख्य मार्गिकेवर तसेच मार्गिकेवरील वाहन अचानक वळत असल्यामुळे अपघात होऊ शकतात. त्यामुळे या व्यावसायिकांच्या विरोधात कठोर कारवाईची शिफारस या बैठकीत करण्यात आली. तसेच वाहतुकीला अडथळे आणणाऱ्या होर्डिंग तातडीने हटविण्याचे निर्देशदेखील जिल्हाधिकारी जावळे यांनी दिले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gokul Politics : बंटी पाटलांना टक्कर देण्यासाठी महायुतीचा 'मास्टरस्ट्रोक'! 'गोकुळ'साठी कोरेंची मध्यस्थी अन् चंद्रकांतदादांनी काढला तोडगा, गुप्त बैठकीत नेमकं काय घडलं?

Pune Property Tax Rush: महापालिकेची ऑनलाइन सिस्टीम कोलमडली, सॉफ्टवेअर अपडेटचा अभाव उघड; ९० कोटींची करवसुली, उद्या १०० कोटींपर्यंत अपेक्षा

Maharashtra Activists Honoured: महा अंनिस राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर; अंधश्रद्धा निर्मूलन, वैज्ञानिक दृष्टिकोन व जातमुक्ती चळवळीत उल्लेखनीय योगदानाचा सन्मान

Leopard Attack : गंगापूर तालुक्यात बिबट्याचा कहर वाढला; भेंडाळा शिवारात कुत्रा ठार, शेतकरी भयभीत, तातडीने बिबट्या पकडण्याची मागणी

Maharashtra GPR System Issue: जीपीआर प्रणालीतील तांत्रिक गोंधळामुळे विद्यार्थ्यांचे भविष्य अधांतरी; ‘आपले सरकार’ केंद्रचालकांचा कामबंद आंदोलनाचा इशारा

SCROLL FOR NEXT