मुंबई

रायगडमधील दोन कृषी सेवा केंद्रांचे परवाने निलंबित

CD

रायगडमधील दोन कृषी सेवा केंद्रांचे परवाने निलंबित
अलिबाग, ता. २९ (वार्ताहर) : शेतकऱ्यांची फसवणूक रोखण्यासाठी रायगड जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाने कारवाई सुरू केली आहे. जिल्ह्यातील सर्व कृषी सेवा केंद्रांची तपासणी सुरू असून, कृषी सेवा केंद्रांमध्ये झालेल्या नियमभंगामुळे पनवेल आणि अलिबाग तालुक्यातील पोयनाड येथील कृषी सेवा केंद्रांचे परवाने निलंबित करण्यात आले आहेत.

खत नियंत्रण आदेश १९८५नुसार रासायनिक खतांचा साठा अद्ययावत ठेवणे, खताची विक्री कमाल दरापेक्षा जास्त किमतीत न करणे, शेतकऱ्यांना ‘एम’ फॉर्ममध्ये बिले देणे तसेच विक्री देयकांमध्ये सर्व आवश्यक तपशिलांचा समावेश करणे आणि अनुदानित खताची विक्री पॉस मशीनद्वारेच करणे या अटी बंधनकारक आहेत. मात्र तपासणीत पनवेल येथील दीपा कृषी सेवा केंद्र व पोयनाड येथील भूषण कृषी सेवा केंद्रात या अटींचे उल्लंघन झाल्याचे आढळून आले. या वेळी तपासणीत रजिस्टरमधील शिल्लक खतसाठा, पॉस मशीनमधील खत साठा व प्रत्यक्ष साठ्यामध्ये फरक आढळला. तसेच शेतकऱ्यांना योग्य पावत्या न देणे व कमाल विक्री दरापेक्षा जास्त दराने खत विक्री केल्याचे निदर्शनास आले. या पार्श्वभूमीवर जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाने दोन्ही कृषी सेवा केंद्रांचे परवाने निलंबित केले आहेत. पुढील काळात जिल्ह्यातील सर्व सेवा केंद्रांची तपासणी अधिक काटेकोरपणे करण्यात येणार असून, नियमभंग करणाऱ्यांवर कठोर कारवाईचा इशारा प्रशासनाने दिला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Auto Taxi Permit: फेक परमिट रिन्यूअलला लगाम लागणार! ऑटो-टॅक्सी चालकांची आता बायोमेट्रिक ओळख होणार, RTOचा कडक निर्णय

Education Recruitment Update: अशासकीय अनुदानित महाविद्यालयांत ५,०१२ सहाय्यक प्राध्यापक भरतीला मंजुरी; आरक्षण अंमलबजावणीसाठी विशेष प्रशिक्षण

Latest Marathi News Live Update : ट्विशाचा पती आणि आरोपी समर्थ सिंग याला पोलिसांनी त्याच्या निवासस्थानी आणले

पालघरमध्ये मोठा राजकीय भूकंप! शिवसेना-भाजपला खिंडार; बड्या नेत्यांचा बविआमध्ये प्रवेश

11th Admission : अकरावी प्रवेशासाठी १२.४९ लाख विद्यार्थ्यांची नोंदणी; पहिल्या फेरीची निवड यादी शुक्रवारी जाहीर

SCROLL FOR NEXT