कासा, ता. ३० (बातमीदार) : डहाणूजवळील वाढवण येथे उभारण्यात येणाऱ्या देशातील पहिल्या बंदर प्रकल्पासाठी वाढवण पोर्ट प्रायव्हेट लिमिटेडने (व्हीपीपीएल) स्थानिकांसाठी स्वतंत्र दोन मार्गिकेचा सेवारस्ता तयार करण्याची घोषणा केली आहे. या निर्णयामुळे परिसरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. मुंबईत मंगळवारी (ता. २९) झालेल्या बंदराच्या संचालक मंडळाच्या बैठकीत ही घोषणा करण्यात आली.
बंदराच्या मुख्य मालवाहतुकीसाठी निर्माण करण्यात येणाऱ्या आठ पदरी महामार्गासोबतच स्थानिक वापरासाठी स्वतंत्र रस्ता उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हा रस्ता टोलमुक्त असणार असून, अंडरपास, क्रॉस पैसेज, उड्डाणपूल आणि पादचारी पूल यांसारख्या आधुनिक सुविधांचा समावेश असेल. या रस्त्यामुळे परिसरातील वाहतूक सुलभ होईल, स्थानिक व्यवसायांना चालना मिळेल, तसेच शेतकरी, डायमेकर, मच्छीमार व इतर कामगारवर्गासाठी बाजारपेठांपर्यंत पोहोचणे अधिक सुलभ होईल. या निर्णयामुळे शिक्षण, आरोग्य आणि उपजीविकेच्या संधींनाही गती मिळेल.
व्हीपीपीएलचे व्यवस्थापकीय संचालक उन्मेष शरद वाघ म्हणाले की, जागतिक दर्जाचे बंदर उभारण्याबरोबरच स्थानिक विकासाला चालना देणे हे आमचे प्रमुख उद्दिष्ट आहे. स्थानिक समुदायांसाठी हा रस्ता म्हणजे आमचे कृतज्ञतेचे प्रतीक असून, या पायाभूत सुविधा परिसराच्या प्रगतीत महत्त्वाची भूमिका बजावतील.
वाढवण बंदरापासून एनएच-२४८एस मार्गावरून हा रस्ता तवा येथील मुंबई-अहमदाबाद महामार्गावर आणि चिंचारी येथील मुंबई-बदोडा एक्स्प्रेस-वेपर्यंत जोडला जाणार आहे. सध्या भू-संपादन प्रक्रिया सुरू असून, या मार्गामुळे दळणवळणात क्रांतिकारी सुधारणा अपेक्षित आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.